aple-mul-anadi-mul-kase-hoil-yasathi-tyache-sangopan-kartana-ya-goshti-lakshat-theva

एक पालक म्हणून सर्वात  आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या मुलाला हसताना आणि आनंदी, यशस्वी झालेलं बघणे. पण कधी-कधी काही गोष्टीमुळे, प्रसंगामुळे मुलांमधील नकारात्मक वाढते. प्रत्येक गोष्टी कडे ते नकारात्मक दृष्टिकोनातून बघू लागते. असे प्रसंग येऊ नये म्हणून आणि आल्यास त्यासाठी काय करावे. हे आम्ही पुढे सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचं मुल आनंदात राहील. आणि नैराश्य आलंच तर त्यावर मात  करायला शिकेल.

१) चांगल्या  आणि सकारात्मक गोष्टींची आठवण

ज्यावेळी काही नकारात्मक घडेल, एखाद्या वेळी मुलं अपयशी होईल. अश्यावेळी त्याला त्या अपयशामुळे किंवा नकारात्मक गोष्टीमुळे नैराश्य येऊ नये म्हणून त्याला आधी घडलेल्या चांगल्या गोष्टीची आठवण करून द्या. या आधीच्या त्याच्या /तिच्या यशाची आठवण करून द्या. आणि त्याचा दृष्टिकोन सकरात्मक करण्याचा प्रयत्न करा. घडलेल्या नकारात्मक गोष्टीतून काहीतरी सकारात्मक शिकवण घ्यायला शिकवा. त्या नकारात्मक / वाईट प्रसंगातून किंवा आलेल्या अपयशाची जाणीव करून देताना त्याला ओरडू नका. रागवू नका. शांतपणे समजवून सांगा. सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करायला प्रोत्साहन द्या.  

२) मुलांसमोर तक्रारी करू नका

तुम्हाला कोणत्या समस्या असतील, कश्या विषयी काही तक्रारी असतील त्याची चर्चा मुलांसमोर करू नका. त्यामुळे मुलाच्या मनात त्या गोष्टीविषयी उगाच अढी बसले आणि नकारात्मकता  वाढेल. तुमच्या मुलाला स्वतः  अनुभव घेऊ द्या आणि त्याचे मत बनवू द्या. आणि मग त्यात काही गैर वाटल्यास त्याला समजा वून सांगा. त्याचा समोर कमीत-कमी नकारात्मक गोष्टीची चर्चा करा.

३) यश

तुमच्या मुलांना एखादं  छोटंसं काम/ टास्क सांगा आणि ते त्याला आव्हान म्हणून स्वीकारायला सांगा. ते काम करण्यात तो/ती यशस्वी होतात का ते बघा आणि यशस्वी झाल्यास त्यांचं यश साजरं  करा. त्यांना त्याची शाबासकी द्या आणि त्यांना द्या. जर तो त्यामध्ये यशस्वी झाला नाही तर त्याला पुढच्या वेळी नीट कर असं समजावा. रागवू नका.

४) आत्मविश्वास

मुलांना त्यांना हवे ते खेळ खेळायचे, हव्या त्या गोष्टी करायचं स्वातंत्र्य द्या. दुरूनच त्यांचा वर  लक्ष ठेवा यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांना त्यांचे कलागुण दाखवण्याची मुभा द्या. आणि त्याचा कला गुणांना वाव द्या. त्यांना त्याच्या आवडीच्या खेळात, कलेत प्रोत्साहन द्या.

५) ताण तणाव पासून दूर ठेवा

तुमच्या समस्यांपासून आणि ताण- तणावांपासून लहान मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. जसे आर्थिक तणाव, आरोग्यविषयक तणाव. जो पर्यंत तुमचे ताण तणाव समजण्या इतपत तुमचे मुल मोठे होत नाही तो पर्यंत  त्याला या सगळ्या पासून लांब ठेवा त्यामुळे त्याला कसला तणाव जाणवणार नाही आणि  ते नेहमी खुश  राहील.

६) लहान मुलांच्या समस्या/तक्रारी  

ज्यावेळी तुमचं मुल तुमच्याकडे एखादी तक्रार किंवा एखादी समस्या घेऊन येईल त्यावेळी ती तक्रार समस्या कितीही लहान असली तरी लक्षपूर्वक ऎका. त्यांना त्याबद्दल सहानभूती दाखवा. त्याची समस्या सोडवाल याची खात्री द्या. त्याच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टीकडे बघा. त्यानं कायम आत्मविश्वास देत राहा. त्यांना कायम आशावादी राहायला शिकवा. 

Leave a Reply

%d bloggers like this: