balasathi-paushtik-lapshiche-pach-prakar

 

बाळासाठी पौष्टिक लापशीचे पाच प्रकार  

लहान मुलाच्या पौष्टिक नाश्त्यामध्ये लापशी हा प्रकार असतोच. कारण लापशी ही पचायला हलकी आणि पौष्टिक असते. तसेच  मऊसर असल्यामुळे बाळाला खायला देखील सोप्पी असते. तसेच लहान मुल किंवा वयस्क व्यक्ती देखील आजारी पडल्यावर त्याला लापशी देतात. म्हणूनच आम्ही काही चवीष्ट आणि पौष्टिक लापशीच्या कृती खाली देत आहोत

१) तांदळाची लापशी

साहित्य

१/२ कप  पाणी

२ चमचे घरी धुवून वाळवलेल्या तांदळाचं  पीठ जर हे पीठ ब्राऊन राईस पासून केलेलं असेल तर उत्तम नाहीतर नेहमीचे वापरातले पांढरे तांदूळ देखील चालतील.

कृती

  एका पॅनमध्ये  पाणी घ्या. त्यात  ते तांदळाचे पीठ घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या

नंतर तो पॅन गॅस वर ठेवून मिश्रण शिजवायला ठेवा चमच्याने ते मिश्रण ढवळत राहा. त्यात गुठळ्या होऊ देऊ नका. ते मिश्रण  थोडं घट्ट होई पर्यंत ढवळत राहा

यात तुम्ही थोडी साखर अथवा मीठ घालू शकता. लापशी जास्त घट्ट झालं असेल तर त्यात दूध ( आईचे दूध) किंवा इतर वरचे दूध घालू शकता (मीठ घेतले असल्यास दूध घालणे टाळावे,त्याऐवजी थोडे पाणी घाला )  

२) नाचणीची लापशी  
साहित्य

१ चमचा घरी केलेलं  नाचणीचे पीठ

आवश्यकतेनुसार पाणी,मीठ, साखर, दूध

कृती

नाचणीचे पीठ पाण्यात घालून मिश्रण बनवा आणि हे मिश्रण ५ ते १० मिनटे  गॅसवर ठेवा आणि नाचणीचे पीठ नीट शिजू द्या. मग त्यात आवडीनुसार साखर ,दूध किंवा मीठ घालून ही लापशी बाळाला भरवा

 ३)  साबुदाण्याची लापशी

  साहित्य

२ टेबलस्पून भिजवलेला साबुदाणा

थोडीशी वेलची पावडर

थोडीशी बदामाची पावडर

चवीनुसार साखर

कृती

एका पातेल्यात पाणी उकळवा, त्यात साबुदाणा घाला साबुदाणा अगदी पारदर्शक होई पर्यंत शिजवा.

त्यात वेलची पावडर आणि बदामाची पावडर घाला. थोडंसं  घट्ट झाल्यावर त्यात थोडी साखर घालून बाळाला भरवा.

 रव्याची लापशी

   साहित्य

१ कप रवा

२ चमचे साजूक तूप

१ चिमटी वेलची पूड

३ कप पाणी

कृती

पॅन /कढई  मध्ये  रवा  चांगला खरपूस भाजून घ्या.

नंतर  एका पॅन  मध्ये ३ कप पाणी घाला आणि ते उकळवा

नंतर  तो रवा त्या उकळत्या पाण्यात घाला. आणि रव्याची गुठळी होणार नाही याची काळजी घ्या.

गुठळी होऊ नये म्हणून ते मिश्रण ढवळत राहा

नंतर त्यात तूप घाला .

आवडी नुसार मीठ किंवा साखर घाला

लापशी घट्ट झाल्यास त्यात साखर घेतली असल्या थोडं दूध घालून लापशी पातळ करा आणि बाळाला भरवा.

हे सर्व लापशीचे प्रकार बाळाला ६ महिन्यानंतर द्यावेत कमीत-कमी ६ महिने बाळाला आईचे दूधच द्यावे.

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: