saha-upayani-prem-vyakt-karun-navryala-ashchrychakeet

 

 

या जगात तुम्ही सर्व काही विकत घेऊ शकता, पण प्रेम कधीच कुठेच विकत घेता येत नाही. प्रेम व्यक्त करण्यासाठी पैसा लागत नसतो, काही वेळा छोट्या- छोट्या गोष्टींनी व्यक्त केलेले प्रेम, हृदयाला भिडून तुमचे नाते घट्ट करते. ह्या छोट्या कृती तुमच्या नवऱ्याबाबत करू शकता. त्यावरून ते तुमच्या प्रेमाला समजून घेतील.

१) आवडते जेवण

तुम्ही विचार करत असला की, हीच कल्पना प्रथमच का घेतली ? ह्यामुळे तुमचे स्वयंपाक करण्याचे कौशल्य पतीला समजून येईल आणि चांगली पदार्थ बनवून खाऊ घालणे किती महत्वाचे आहे. व त्यामुळे तुम्हाला किती आनंद मिळतो हे त्यांना कळेल.

२) प्रेम व्यक्त करा

तुम्ही शेवटच्या वेळी कधी तुमचे प्रेम व्यक्त केले ? आणि ते कोणत्या पद्धतीने. कारण पुन्हा त्या गोष्टींनी तुम्ही तुमच्या प्रेमाला व्यक्त करू शकता. प्रेम व्यक्त करायला साध्या गोष्टीनेही व्यक्त करता येते फक्त ते व्यक्त करा. त्यासाठी लाज बाळगू नका.

३) काहीही न सांगता सहलीचे नियोजन करा

दररोजच्या दैनंदिन रुटीन मधून बदल गरजेचा असतो. आणि जर एखादी व्यक्ती जॉबवर असेल आणि नेहमी आपल्या कामात व्यस्त असते. त्यांनी जरूर याचा विचार करून सहलीचे नियोजन करा. अशा एकांत ठिकाणी जाऊन तुम्हाला बाळाविषयीचे स्वप्न, भविष्यातील प्लॅन व तुमच्या जुन्या आठवणी याबाबत संवाद करता येईल, आणि सोबत खूप गप्पा मारता येतील. या सहलीमुळे तुम्हाला उत्साहित व टवटवीत वाटेल.

४) जुन्या आठवणींचा अल्बम

जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत नसाल, पण तुम्हाला तुमच्या साथीच्या जीवनात आनंद भरायचा असेल तर सोशल माध्यमांचा वापर करून घ्या. फेसबुक वर तुमची जुनी फोटो टाका. व रात्री एकांत असताना एकदम टी. व्ही वर तुमच्या फोटोचा अल्बम चालू करा. ती जुनी फोटो बघितल्यावर तुम्ही दोघे शांत होऊन जुन्या आठवणी किती छान होत्या आणि आता आपण कसे आहोत, यावर तुमचे विचारमंथन सुरु होईल. आणि तुम्ही दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडाल.

५) सर्जनशील भेट द्या

गिफ्ट देण्यासाठी खूप पैसे खर्च करू नका. काहीतरी नावीन्यपूर्वक विचार करून एखादी भेट द्या. मग त्यात जर जोडीदार वेळेवर येत नसेल तर घड्याळ भेट देणे. एखाद्या अंध मुलांच्या, कर्णबधिर, किंवा अनाथ मुलांच्या शाळेत जाऊन भेट देण्याच्या प्लॅन करा. याही गोष्टीमुळे जोडीदाराच्या मनात तुमच्या बाबतीत आदराची जागा होईल.

६) जोडीदाराचे मनातले ओळखा  

एखादा दिवस, असा विचार करण्यासाठी द्या की, माझ्या जोडीदाराला काय आवडत असेल. त्याचे आवडते जेवण कोणते ? त्याला टी. व्ही वर कोणता शो पाहायला आवडतो? त्याला कोणत्या गोष्टीने हसू येईल ? याची यादी करून ती पूर्ण करायचे  ठरावा. यामध्ये तुम्हाला आनंदही वाटेल. व नवीनच काहीतरी रचना सुद्धा होईल. आणि या कल्पना प्रत्यक्ष आल्यावर जोडीदाराला खूप आश्चर्य वाटेल. जमल्यास स्वतः प्रयोग करून बघा. समोरची व्यक्तीच्या या कृतीने डोळ्यात आनंदाश्रू  उभे राहतील.

एखादा दिवस अप्रत्यक्षपणे तुमच्या जोडीदाराची जी घराकडची माणसं असतील त्यांना बोलावून जेवणाची पार्टी द्या. त्याच्या  जवळच्या लोकांना बोलावून घ्या. अशाच नवीन कल्पनांनी तुमचे आयुष्य समृद्ध क

Leave a Reply

%d bloggers like this: