balachi-angtha-choknyamagchi-savay-karne-upay

बाळ हे मातेच्या गर्भात असल्यापासूनच त्याची अंगठा चोखायला सुरवात होते. त्याची ही सवय जन्म झाल्यावर काही काळ तशीच राहते. त्याचे अंगठा चोखणे म्हणजे त्याच्या काही भावनांचे प्रदर्शन असते ज्या त्याला आपल्याला सांगता येत नाहीत. अंगठा चोखणे म्हणजे त्याला भूक लागली असू शकते अथवा त्याला भीती वाटत असेल किंवा त्याला झोपायचे आहे. सुरवातीला तुमचे बाळ खूप वेळा असे करेल , तेंव्हा त्याला त्याचा अंगठा दूर करून थांबू नका, अशाने त्याची सुरक्षिततेची भावना कमी होईल.

बाळाला स्वतःला शांत करण्यासाठी शिकवण्याचा हा सर्वात उत्तम पर्याय आहे. तुम्ही त्याला अंगठा चोखण्यापासून थांबवले तर त्याची उत्सुकता अजून वाढेल आणि ते अजून जास्त अंगठा चोखू लागेल. लहानग्यांना असे गोष्टींपासून परावृत्त करत राहिल्यास त्यांच्यात बंडपणाची वृत्ती वाढते.
यापेक्षा तुम्ही त्याच्या अंगठा चोखण्याच्या प्रवृत्तीचे निरीक्षण करा. बाळ कधी कधी अंगठा चोखते याकडे लक्ष दया. एकदा तुम्हाला त्याची सवय आणि कारण माहीत झाले की तुम्ही त्यावर अंकुश आणू शकता. त्याने तोंडात अंगठा घातला की त्याचे लक्ष विचलित करा, त्याच्याशी खेळा. बाळ टीव्ही समोर असेल तर त्याला हातात एखादा माऊ चेंडू किंवा खेळणे दया जेणेकरून त्याचे हात व्यग्र राहतील आणि तो तोंडात बोट घालणार नाही. झोप आल्यामुळे तो असे करत असेल तर त्याला अंगाई गाऊन, कधी एखादी गोष्ट सांगून शांतपणे निजवा.
तुमच्या पाल्याच्या अंगठा चोखण्याबद्दल जास्त चिंता करू नका, ही सामान्य बाब आहे. परंतु त्याच्या चोखण्याच्या जोरावर लक्ष दया. सुरवातीला सगळीच मुले हळू हळू अंगठा चोखतात परंतु नंतर त्यांची जिभेची आणि दातांची हालचाल जोर धरते. या हालचालींकडे लक्ष राहू दया आणि शक्यतो बाळ ४ वर्षाचे होईपर्यंत त्याची ही सवय मोडेल असे बघा.
दुधाचे दात पडल्यावर पक्के दात येतांना या सवयीमुळे त्याच्या दाताचे आणि हनुवटीचे आकार बिघडू शकतात. वय ६ वर्षे पूर्ण होण्याआधीच ही सवय बाळाला मोडायला लावा. जरी तुमचे पाल्य हट्टीपणा करत असेल तरीही सगळ्या प्रकारे प्रयत्न करून त्याचे अंगठा चोखणे बंद करा.

Leave a Reply

%d bloggers like this: