garodarpanat-lohachya-sevanat-yenare-adathale

 

गर्भवती झाल्यावर स्त्रियांच्या आयुष्यात खूप बदल घडतात. या सर्व शारीरिक आणि संप्रेरक बदलांमुळे तुमच्या शरीराला लागणारी उर्जा आणि जीवनसत्वांची गरज सुद्धा वाढते. ही गरज पूर्ण होत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुमच्या आहारावर कडक नजर ठेवा, खास करून तुमच्या जीवनसत्वांच्या सेवनावर. काही महत्वाच्या गोष्टी पाळणे या काळात गरजेचे असते.

गरोदरपणात उर्जेची गरज का भासते?

आहाराच्या बाबतीत म्हणायचे झाले तर गरोदरपणात सगळ्यात जास्त उर्जेची गरज ही लोहाद्वारे भागवली जाते. आहारात लोहाचे प्रमाण असणे कोणत्याही स्त्री साठी अतिशय आवश्यक असते. मासिक पाळीतील  रक्तस्त्रावामुळे नियमितपणे तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होत असते आणि शरीराला लोहाची गरज भासते. हिमोग्लोबिन हे रक्तामध्ये लोह मिसळण्यासाठी मधल्या दुव्याचे काम करते. म्हणजेच लाल पेशींच्या अभिसरणाचे काम हिमोग्लोबिनमुळे जलद होते. म्हणूनच शरीरात लोहाचे प्रमाण योग्य असणे हे प्रत्येक स्त्री साठी अतिशय महत्वाचे आहे. 

गरोदर असताना तर शरीरात असणारे लोह गर्भवतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. पुरेश्या प्रमाणात लोहयुक्त पदार्थांचे सेवन न करणे हे बाळाचा जीव धोक्यात घालण्याबरोबर आहे. तुमच्या माहितीसाठी सांगायचे तर, लोहाची कमतरता भ्रूणाच्या अपूर्ण वाढीसाठी कारणीभूत असते. बाळाच्या मेंदू विकासासाठी पुरेश्या प्रमाणात लोह मिळणे गरजेचे आहे, म्हणून ते इतके महत्वाचे ठरते. लोह कमी पडल्यास त्याचे परिणाम बाळाच्या वाढीवर दिसू शकतात जसे, उशिरा बोलणे, नैराश्य, थकवा इ. त्यामुळे शरीरातील लोह्प्रमाण ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नक्कीच नाहीये.

लोहाची कमतरता अजून एका प्रकारासाठी ठरते तो म्हणजे ‘अनेमिया’. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी घटते आणि त्याचे गर्भधारणेवर धोकादायक परिणाम उदभवू शकतात, जसे, मुदतपूर्व प्रसूती कळा, भृणाचा मृत्यू किंवा कमी वजनाच्या बाळाचा जन्म होणे. या कारणामुळे जन्म देणाऱ्या मातेच्या जीवासही धोका उद्भवतो.
गरोदरपणात आणि गरोदर नसतानाही स्त्रियांसाठी लोहाचे योग्य प्रमाण आहारात असणे किती गरजेचे आहे ते आपण पहिले.   

आता पाहूयात की, या लोहाला रक्तात शोषून घेण्यासाठी कोणते अडथळे येतात. मानवी शरीरात काही ठराविक पोषकत्वे आणि रासायनिक घटक असतात जे लोहाचे आपल्या शरीरावरील परिणाम घडू देत नाहीत, म्हणून त्यांचे प्रकार जाणून घेणे महत्वाचे ठरते जेणेकरून भविष्यात ते आपल्याला टाळता येतील.

१)  कॅल्शियम

कॅल्शियम हिम(heme) आणि नॉन-हिम (non-heme) (उर्जेसाठी आवश्यक असणारी प्रथिने) अशा दोन्ही प्रकारच्या लोहाच्या शोषणात अडथळे निर्माण करते. तुम्ही दुध, चीज ,सोयाबीन, ब्रोकोली इ. पदार्थांचे सेवन टाळायला हवे.  जरी कॅल्शियम तुमच्या हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असले, तरीही दोन्हीचे आहारातील प्रमाण योग्य असायला हवे. बाळाच्या योग्य वाढीसाठी तुमच्या आहारावर बारीक लक्ष ठेवा.

२)  कॅफेन

ज्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफेन आढळते म्हणजेच हवाबंद पेय, कॉफी इत्यादी पदार्थ या काळात टाळा. कॅफेन मध्ये उपस्थित असणारे घटक लोह रक्तात शोषून घेण्यास अडथळा निर्माण करतात, आणि शरीर कमजोर होते. असे आढळून आले आहे कि ज्या महिला कॅफेनचे गरजेपेक्षा जास्त सेवन करतात त्यांच्या बाबतीत गर्भ पाडणे, मृत बाळाचा जन्म, आणि तिसऱ्या त्रैमासिकात अथवा त्या आधी गर्भपात याचे प्रमाण जास्त आहे. अशावेळी अपुर्ण वाढ झालेले बाळ किंवा कमी वजनाचे बाळ देखील जन्म घेऊ शकते. तेंव्हा जर तुम्हाला कॉफीची सवय असेल आणि तुम्ही आई होणार आहात तर आमचा सल्ला आहे की ‘’कॉफी आजच थांबवा”.

३)  पोलीफेनोल आणि फेनोलिक आम्ल आढळून येणारे पदार्थ

ही दोन्ही रसायने तुमच्या शरीरात लोह शोषण प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात, म्हणून हे दोन घटक उपस्थित असणाऱ्या पदार्थांपासून दूरच रहा. यामध्ये  डार्क चोकलेट (कोको मध्ये पोलीफेनोल्स चे प्रमाण अधिक असते.), डोंगरी बदाम (हेझल नट्स), स्ट्रॉबेरी आणि सोया दही यांचा समावेश होतो.

४)  फायटेटस्

अजून एक घटक जे लोहशोषणात अडथळा निर्माण करतात ते म्हणजे फायटेटस् किंवा फायटीक आम्ल. संपूर्ण गहू, बटाटे आणि काजू यांमध्ये हा घटक प्रामुख्याने आढळतो.‘जीवनसत्व सी’ चे भरपूर सेवन करा जे फायटिक आम्लाचा परिणाम नष्ट करते व लोह रक्तात शोषले जाते. याबरोबरच, अब्सोर्बिक आम्ल जास्त असणार्‍या पदार्थांचे सेवन करा, यातील घटक शरीराला लोह शोषून घेण्यास सगळ्यात जास्त मदत करतात. जसे, मासे, मांस, संत्री, हिरव्या भाज्या यांमध्ये अब्सोर्बिक आम्ल आढळते. या पदार्थांचा आहारात समावेश करून घ्या.काळजी घ्या.
        

Leave a Reply

%d bloggers like this: