balabarobar-pahilyanda-bahergavi-firayla-jatana-ya-goshti-lakshat-theva

 

तुमच्या बाळाच्या जन्मानंतर ज्यावेळी तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळी छोट्याश्या सुट्टीवर जायचा बेत आखता त्यावेळी तुम्हाला आधी ज्यावेळी फिरायला जायचा त्यापेक्षा वेगळी काळजी घेणे गरजेचे असते. आता तुम्हला काही दिवस तरी अचानक बेत ठरवून चालणार नाही. आता अगदी तुमची बॅग भरण्यापासून ठिकाणापर्यंतच्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते.  अश्यावेळी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या हे तुम्हाला सांगणार आहोत

१. संधीचा उपयोग करून घ्या.

   बाळाच्या जन्मानंतर काही महिन्याने तुम्हाला बाहेरगावी एखादी छोट्याश्या सुट्टीवर  जायची संधी अली तर त्या संधीचा उपयोग करून घ्या. रोजच्या दिनक्रमातून छोटासा ब्रेक मिळेल. आणि तुम्हाला जोडीदाराबरोबर काही  वेळ  एकांतात घालवायची संधी मिळेल . तसेच तुमच्या मुलाला देखील, नवीन ठिकाणी जाण्याचा अनुभव मिळेल. त्यामुळे  अश्या संधीचा उपयोग करून घ्या.

२. कमी अपेक्षा ठेवा.

लहान मुल  झाल्यानंतर पहिल्यादा सुट्टीवर गेल्यावर तुमची ही  सुट्टी देखील आधीच्या सुट्टीसारखीच  जाईल अशी अपेक्षा ठेवू नका. आता तुमच्या बरोबर एक छोटंसं  पिल्लू असणारा  त्याचे हट्ट तुम्हाला आता पुरवायचे आहेत. मुलाच्या हटटमुळे किंवा रडण्यामुळेची तुमची चीड होण्याची शक्यता आहे पण अश्या वेळी शांत राहा. कुणावर चिडचिड करू नका. शांत राहून सुट्टीचा आनंद घ्यायचा प्रयन्त करा.  

३. कमी पण गरजेचे सामान बरोबर असू द्या

लहान मुल बरोबर असताना फिरायला जाताना कमी सामान बरोबर असेल तर ते तुमच्यासाठी सोयीचे ठरेल. कमी पण गरजेचे असे सामान बरोबर असू द्या. या सामानात लहान मुलाचा गरम कपड्याचा एक जोड आणि  त्याची औषध  घ्यायला विसरू नका.

४. बाळाची सोय बघा

जर तुम्ही प्रवासाला जाताना स्ट्रोलर किंवा इतर बाळाच्या वस्तू  जसं डायपर्स तुम्ही बरोबर नेणार नसाल  तर, तुम्ही जाणाऱ्या ठिकाणी या गोष्टीची सोय आहे का? याची चौकशी करा व ज्या हॉटेल किंवा ठिकाणी तुम्ही उतरणार असाल त्या ठिकाणी किंवा आसपास या गोष्टी उपलब्ध होतील याची खात्री करून घ्या.  

५. तुमच्या मुलाची करमणूक  करा

कधी कधी तुम्ही सुट्टीवर जात त्या ठिकाणी तुमच्या मुलाला कंटाळवाणं वाटण्याची शक्यता असते. तुम्ही आराम करायचा प्रयत्न करत असता पण तुमच्या मुलाला कंटाळा येतो. अश्यावेळी मुलाशी खेळा. त्याला आसपासच्या गमती जमती दाखवा. त्याला कंटाळा येणार नाही याची काळजी घ्या.

टीप-लहान मुलांना पहिल्यांदा सुट्टीवर नेण्याआधी बाळाच्या प्रकृती नुसार ठिकाण निवडा. आणि जाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आणि बाळाला लागणारी औषधे  घ्यायला विसरू नका

Leave a Reply

%d bloggers like this: