navjat-balachya-dokyachi-kalji

 

जन्माच्या वेळी तुमच्या बाळाच्या मस्तकाचा परीघ साधारणतः १३.८ इंच एवढा असतो. मस्तकाचा आकार शरीराच्या तुलनेत थोडा मोठा असणे सामान्य आहे, यात काळजी करण्यासारखे काही नाही. कालांतराने शरीर वाढते. बाळाचा जन्म झाला अगदी त्या क्षणापासून ते वय वर्ष १ पर्यंत बाळाच्या डोक्याची आणि मेंदूची वाढ आणि विकास होत असतो. पहिले एक वर्ष हे तुमच्या बाळाच्या अंतर्गत विकासासाठी अतिशय महत्वाचे असते.

प्रसुतीवेळी बाळाचे डोके आणि कवटी अतिशय नाजूक असतात. मस्तक नरम असते जेणेकरून आईला  बाळाला गर्भातून बाहेर ढकलण्यास मदत होते. तुमच्या बाळाचे हे नाजूक डोके नंतर च्या काही महिन्यात विकसित होत जाते.

डोक्याचे कवच, किंवा बाळाचे टाळू १८ महिन्यापर्यंत पूर्णपणे विकसित होते. तुमच्या बाळाच्या डोक्यावर २ ठिकाणी मऊ जागा असतात जिथे स्नायू विकसित होतात. बाळ कधी डोक्यावर पडले तर मेंदूला जास्त मार लागू नये म्हणून ही  ही जागा घट्ट होईपर्यंत बाळाचे डोके अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे बाळाची काळजी घ्या.
बाळाचा माथा म्हणजेच टाळू. हा टाळू बाळाच्या मेंदूच्या विकास प्रक्रियेची माहिती आपल्याला देतो. टाळूवरून बाळ आजारी असेल तर आपल्याला कळू शकते किंवा बाळाचे डोके दुखत असेल तर लक्षात येते. थोडा आत गेलेला टाळू हे डीहायड्रेशनचे (निर्जलीकरण) लक्षण आहे.( परंतू  हि तपासणी घरी करू नये डॉक्टरांना करू द्यावी)

डॉक्टरांना बाळाच्या मेंदूचे विश्लेषण जन्मानंतर लगेच देता येत नाही कारण मेंदूचा पूर्णपणे विकास होण्याची प्रक्रिया ही त्यानंतर काही आठवडे चालूच असते.
जन्मापासून ते बाळ १ वर्षाचे होईपर्यंत तुमच्या बाळाच्या मेंदूचा आकार मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. नैसर्गिक प्रसुती झालेल्या मातांचे बाळ डोक्याला थोडे निमुळते असू शकते आणि शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती झालेल्या बाळांचे डोके सपाट असते. मस्तकाला विशिष्ट आकार येण्यासाठी काही कालावधी लागतो.

झोपताना बाळाला योग्य आकाराची आणि आरामदायी उशी ठेवा म्हणजे डोक्याचा आकार नीट होईल आणि त्याची काळजी घेतली जाईल. बाळाची आणि त्याच्या नाजूक डोक्याची योग्य काळजी आणि उत्तम विकास तुमच्या हातात आहे.  

Leave a Reply

%d bloggers like this: