balache-pahile-radu-ani-shvas

तुमचं बाळ ९ महिने सुरक्षितरित्या तुमच्या पोटात राहिल्यानंतर,बाळाचा जन्म होतो आणि आता त्याला बाहेरच्या वातावरणाशी मिळतं जुळतं घ्यायचं असतं. त्यावेळी जन्मला आल्या आल्या बाळ पहिला श्वास कसा घेता आणि त्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज असते ते आपण पाहणार आहोत.

बाळाचे पहिले रडू आणि श्वसोच्छ्वासबा

ळाच्या जन्माच्या वेळी त्याच्या रडण्यामुळे त्याचा जन्म सुखरुप झाल्याची आनंदवार्ता तुम्हाला समजते.त्याचप्रमाणे बाळाचे पहिले रडू बाळाच्या जन्माच्या साधारणतः २० सेकंदापासून ते एक मिनिटा पर्यंत सुरु झाले पाहिजे. हे त्याच्या आरोग्यासाठी देखील खूप महत्वाचे असते. जेव्हा बाळ जन्मानंतर प्रथम रडते तेव्हापासून आईच्या गर्भाबाहेर  श्वास घेण्यासाठी त्याची फुफ्फुसे कार्यरत होतात. लहान बाळ जर रडले नाही तर त्याला पाठीवर थोपटून. कमरेवर हळू फटके मारून रडवणे गरजेचे असते ज्यामुळे बाळ श्वास घ्यायला लागते. आपण बऱ्याच सिनेमात , व्हिडीओ मध्ये पहिले आहे. लहान बाळ जन्माला आल्यावर त्याला पायाला पकडून त्याचा पाठीवर किंवा कमरेवर हलकेच फटके मारून त्याला रडवत असतात. आणि अश्या प्रकारे बाळ रडले नाही तर डॉक्टर कृत्रिमरित्या श्वास घेण्यास मदत करतात

जन्मानंतरच्या २४ तासातील बाळाच्या रडण्याचे महत्व

जन्मानंतरच्या २४ तासात लहान बाळ ज्यावेळी विनाकारण रडते त्यावेळी. त्याची श्वास नलिका स्वच्छ होत असते त्या अडकलेले काही द्रव व इतर गोष्टी निघून जात असतात. (विनाकारण म्हणजे बाळाला इतर काही त्रास होत नाही काही चावत  नाही ना काही टोचत नाही ना याची खात्री करून सुद्धा बाळ रद्द असल्यास. बाळ सतत न  थांबता रडत सरल तर डॉक्टरांना त्याबद्दल सांगा)

 

Leave a Reply

%d bloggers like this: