garodrpanat-malmal-aani-dokedukhivar-upay

  प्रसूतीच्या वेळी मानसिक व शारीरिक ताण असतो. पण प्रसूतीच्या दुसऱ्या अंगाने विचार केल्यास आनंद व मजाही असते. कारण तुम्हाला जे खायला आवडते ते तुम्ही खाऊ शकता, २४/७ सैलसर कपडे घालता येतात, सोबत आराम व झोपही मिळते. ही वेळ तुमच्यासाठी आनंदाची असते. पण काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक ठरतात. आणि तुमच्या आनंदात विरजण टाकतात. त्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या समस्या दिल्या आहेत व त्याला काय उपाय करत येईल.   

१) सकाळची मळमळ

ह्या समस्येला सर्वच गरोदर मातांना तोंड द्यावे लागते, या संबंधी आम्ही अगोदरच्या लेखात माहिती दिलीच आहे. तुम्हाला जर सकाळी उलट्या व मळमळणे होत असेल, तर खाली दिलेले उपाय तुम्ही करू शकता. ते तुम्हाला खूप मदत करतील.

१. द्रव पदार्थ जास्त घ्या, जास्तीस्त जास्त पाणी प्या, हर्बल चहा घ्या, लिंबू पाणी घेत राहा,

२. असे जेवण घ्या ज्यामुळे पचन हलके होण्यास मदत होईल, आणि मसालेदार व मीठयुक्त पदार्थ टाळा.

२) शरीरातल्या शिरा, नसा या सुजून गेल्यामुळे आणि शरीरातल्या काही घटकावर दबाव पडल्यामुळे ही समस्या तयार होते.

१. जास्त कर्बोदके असलेला आहार घ्या.

२. मोठ्या प्रमाणात पाणी पिणे हा सर्वात छान उपाय आहे.

३. गरम पाण्याने अंघोळ करा म्हणजे तुम्हाला आरामदायक वाटेल व तुमच्या हालचाली वेगाने वाढतील.

२) डोकेदुखी

गरोदरपणात हार्मोनल बदलामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होते. बऱ्याच वेळा तुम्हाला खूप भूक लागते व त्याच वेळी तुम्हाला संताप, राग खूप येतो मग या दोन्हीचे एकत्रीकरण म्हणूनही डोकं दुखत असते.

१. राग व संताप कमी करा.

२. डोक्याचा मसाज करीत राहा

३. जर तुम्ही ध्यान करत नसाल तर आता ध्यान करणे सुरु करा.

३) अपचनामुळे होणारी छातीत जळजळ

छातीमध्ये आणि घशात जळजळ वाटायला लागते. यामुळे पूर्णपणे मूड जातो. व एकसारख्या वेदना होतात म्हणून अस्वस्थ वाटते. तेव्हा यावरती काही उपाय

१. एखादी चघळण्याची गोळी किंवा चुईंग गम घ्यावी यामुळे जास्त प्रमाणात लाळेचे उत्सर्जन होऊन छातीत जळजळ कमी होते.

२.  तुमची झोप पूर्ण होत आहे ना, नसेल तर झोप पूर्ण घेत जा. खाल्यानंतर लगेच झोपू नका, खाल्यांनंतर थोडा कालावधीनंतरच झोप घ्या.

हे साधे घरी करण्याचे उपाय आहेत. त्यामुळे करून बघा.

Leave a Reply

%d bloggers like this: