अंड म्हणालं की सकाळचा नाश्ता, भुर्जी पाव, उकडलेलं अंड अश्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. परंतु अंड्याचे अजून बरेच फायदे आहेत. अंड्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. अंड हे त्वचेचा आणि केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. अंड हे कश्याप्रकारे चेहरा आणि केसाच्या समस्यांसाठी उपयुक्त असते हे आपण पाहणार आहोत
१) केसातील कोंडा आणि राठ केस
हो अंड हे केसातील कोंड्यावर उपाय ठरू शकते. यासाठी तुम्हांला एग मास्क तयार करावा लागेल.त्यासाठी अंड फोडून त्यातील बलक एका भांड्यात घ्यावे. त्यात एक चमचा दही आणि १ चमचा ऑलिव्ह ऑइल घालावे आणि ते मिक्स करून केसांवर त्याचा मास्क तयार करा. आणि केसांना लावा हा मास्क ४५ मिनटे केकवर राहु द्या. त्यानंतर केस धुवून टाका. आणि असे दर आठवड्यातून एकदा करा. महिन्याभरात तुमच्या केसांचा पोत सुधारल्याचे लक्षात येईल.
२. निस्तेज आणि खराब झालेले केस
अश्याप्रकारच्या केसांसाठी लिंबू आणि अंड्याचा मास्क केसांना लावा. थोडासा लिंबाचा रस फेटलेल्या अंड्यात घालून हा मास्क तयार करा, आणि केसांना लावा आणि अर्धा तास हा मास्क असाच राहू द्या. अर्ध्य तासानंतर हा मास्क धुवून टाका. यामुळे तुमचे केस पहिल्या पेक्षा जास्त चमकदार दिसतील तसेच केसांची वाढ चांगली होईल.
टीप – हा मास्क केसं लावू झाल्यावर केस खूप गरम पाण्याने धुवू नये. केस धुण्यासाठी कोमट पाण्याने केस धुवावे.
३. तेलकट केस
एक अंड फोडून त्यातील पिवळा भाग कडून टाका. त्यातील पांढरा पातळ पदार्थ फेस येईपर्यंत फेटा आणि नंतर केसांना लावा आणि अर्धा तासाने केस धुवा. आठवड्यातून एकदा हा मास्क लावा. यामुळे केसांचा तेलकट पण कमी होईल आणि केस चमकदार होतील .
४. डोळ्यांसाठी मास्क
अंड्यातील पिवळा बलक वेगळा करून त्यातील पांढरा पातळ पारदर्शक द्रव पदार्थ फेटून डोळ्याखाली लावा. आणि १० मिनटे तसाच राहू द्या. आणि शांत डोळे मिटून बसा. १० मिनिटा नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. आणि असे रोज करा. थोडेच दिवसात डोळ्याचा निस्तेजपणा कमी होऊन डोळ्यांचा थकवा कमी होईल.
५. निस्तेज त्वचा
फेटलेल्या अंड्यामध्ये काही थेंब मंद आणि गुलाब पाणी घाला आणि ते मिश्रण नीट मिक्स करा आणि हे मिश्रण. चेहऱयावर लावा. हे मिश्रण २० मिनटे वाळू द्या. आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. यामुळे तुमची त्वचा तजेलदार बनेन.