balala-divasatun-kiti-vela-stanpan-dyave

 

        नवीन बाळाचा जन्म झाल्यावर पालकांना बाळाची भूक आणि त्याला किती  वेळा दूध  पाजावे?  याबाबत प्रश्न पडतात . तसेच बाळाच्या भुकेची वेळ कशी ठरवायची. आपण बाळाला जास्त तर दूध पाजले नाही ना किंवा बाळाचे पोट भरले तर असेल ना? असा गोंधळ तुमच्या डोक्यात चालू राहतो. तुमचा गोंधळ कमी करण्यासाठी, आम्ही तुम्हाला बाळाच्या स्तनपानाबाबत  वेळापत्रक सांगतो.

पहिल्या आठवड्यातल्या दिवसात बाळ खूप वेळा भूक लागते पण तुम्ही दिवसातून आठ वेळा खाऊ घालू शकता. आणि ६०-१२० ml दुध पाजवू शकता. नवीन बाळाला ४०  मिनिटापर्यंत स्तनपान करायचे असते. जसजसा बाळ मोठे होऊ लागते तसे बाळाला १५ -२० मिनिटात स्तनपान द्यावे . पहिल्या महिन्यात बाळाला जेव्हाही भूक लागेल तेव्हा स्तनपान करू शकता त्यासाठी काही नियम नाही.

१ ते ४ महिन्यात

या दिवसात बाळाला २ ते ३ तासांनी स्तनपान करावे लागेल आणि अंदाजे १२०- २१० ml दूध द्यावे लागेल. या ठिकाणी १- ३ महिन्याचा बाळासाठी प्रत्येकी २ – ३ तासांनी १५० ते २१० ml दूध द्यावे. आणि ३ ते ४ महिन्याचा दरम्यान १५० – २१० ml आणि प्रत्येकी २.५ ते ३.५ तासांनी. आणि बरेच पालक या महिन्यात बाळाला अन्न द्यायला लागतात पण त्याचा घसा व स्नायू सशक्त झालेले नसतात तेव्हा असा प्रयोग करू नये.

४ ते ६ महिन्यात

तुमचे बाळ सहा महिन्याचे होणार असते, अंदाजे ते दररोज १ लिटर दूध पित असेल. या वेळी आई बाळाला सकस अन्न द्यायला सुरुवात करते, ते वाटल्यास बाळाच्या प्रकृतीनुसार डॉक्टरांशी बोलून अन्न द्यावे. पण त्याचबरोबर सकस आहार सुरु केला म्हणजे स्तनपान कमी करावे का ? तर नाही स्तनपान करणे बाळाच्या संपूर्ण वाढीसाठी महत्वाचे आहे. आमच्या मागच्या लेखात बाळाचा आहाराचा पॅटर्न दिलाय तो तुम्ही वाचू शकता.  

६ ते ८ महिन्यात

या वयाच्या बाळाला, स्तनपानाबरोबरच त्याला सकस हलका आहार २- ३ वेळा दिवसातून द्यावा. ४-८ चमचे फळांचा, सिरेल्स, देऊ शकता.

८ ते १० महिन्यात

या वयात, बाळाचा  प्रोटीनयुक्त डायट ठेवायला काही हरकत नाही, दिवसातून ३ वेळा असा आहार दिला गेला पाहिजे. त्यांना किती वेळा असा आहार पाहिजे तसे तुम्हाला त्यांच्या खाण्याच्या मागणीवर समजून जाईल.  

१० ते १२ महिन्यात

बाळाला त्याचप्रमाणे ३ ते ४ वेळा हलका आहार व  ४ ते ५ तासांनी स्तनपान. यामध्ये तुम्हालाच बाळाचा आहार समजून येईल. त्याला खाण्याच्या सवयही लावून द्या.

माझ्या बाळाला भूक लागलीय असे कसे कळेल असा प्रश्न बऱ्याच मातांचा असतो. तेव्हा तुमचे बाळ काही संकेत देते त्यावरून कळते की, बाळाला भूक लागली आहे.

त्याचे डोकं डावी – उजवीकडे फिरवणे, बोटं, खेळणे असतील त्याला दात लावण्याचा प्रयत्न करणे, आणि रडणे सामान्यतः बाळ भूक लागल्यावर जोरजोराने रडते. तेव्हा समजून घ्यायचे की, बाळाला भूक लागली आहे .

बाळाच्या ओठापाशी बोट नेले असता ते चोखण्याचा प्रयत्न करते

बाळ जितके स्तनपान करते तितके स्तनपानासाठी अंगावरचे दूध वाढते. नैसर्गिकपणे उशिरा मध्यरात्रीपर्यंत बाळाला भूक लागते व तेव्हा त्याला स्तनपान करावे लागते. जर तुमच्या बाळाचे वजन कमी झाले, याचा अर्थ असा नाही की, त्याला पुरेसे खायला मिळत नसेल.

टीप : बाळाला पुरेसा आहार मिळतोय का  बघण्यासाठी संकेत ; सामान्यतः पहिल्या २ दिवसात, तुमच्या बाळाला २ – ३ नॅपीज लागतात. मग काही दिवसांनी तुमचे बाळ ६ डायपर वापरते. ह्याच्यानेही कळते की बाळाला पुरेसा आहार मिळत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: