he-annpadarth-garodarpanachya-tisrya-trimasikat-kahnyache-talave

 

आई होणे कोणत्या स्त्रीला आवडणार नाही. प्रत्येक स्त्रीला मातृत्व हवे असते. आणि तुम्ही जेव्हा गरोदर असता, तेव्हा तुमची स्वतःची काळजी, त्याचबरोबर गर्भात असलेल्या बाळाची वाढ या गोष्टी करताना खूप सावध राहावे लागते. कारण काम करताना, प्रवासात, खाणे, इतर कामे करताना दक्षता घ्यायची असते की, आपल्या पोटात बाळ आहे. त्यावरती काही परिणाम व्हायला नको. खाण्याच्याबाबतीत बाळावर काही साईड इफेक्ट होणार याचीही काळजी घ्यावी लागते. आणि जर काही पदार्थामधून ऍलर्जी झाली असेल किंवा होईल या अगोदरच जाणून घ्या. या ठिकणी तुम्हाला गरोदरपणाच्या तिसऱ्या त्रैमासिकात कोणती अन्नपदार्थ खाऊ नयेत त्याविषयी माहिती

१)  कॅफेनयुक्त पदार्थ

अन्नपदार्थ घेताना ती थंड व शीतपेये असतील तर त्यात कॅफेन असते व बाकीचे घटक असतात ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी अपायकारक होऊ शकतात. आणि महत्वाचे म्हणजे कॅफेनचा मात्रा  असलेली शीतपेये किंवा फूड जर खाणे  बंद केलेच तर योग्यच राहील कारण कॅफेन हा घटक शरीरातील आयरन शोषणाचे काम करतो व गरोदरपणात आयरनचे प्रमाण कमी झाले तर शरीर कमजोर होते. तेव्हा हे पदार्थ खाण्याचे बंद करावीत. आणि आयरन चे प्रमाण कमी होईल असा पदार्थ घेऊच नये. काही संशोधनानुसार ज्या महिला जास्त प्रमाणात कॅफेन घेतात ती बाळ दगावण्याचा धोका असतो. प्रसूती ही सिझेरियन होते. प्रसूतीनंतर बाळाचे वजन कमी भरते, त्याच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली नसते. म्हणून जर तुम्ही खूप कॉफी व शीतपेये घेत असाल तर बंद करा मोहीम सुरु करा.

२) पपई

काही फळ अशी असतात ती  गरोदर स्त्रीने खाऊच नये. तिच्यासाठी ती फळं निषिद्धच असतात, जरी तिला कितीही खाण्याची इच्छा असेना. त्याच वर्गात पपई नावाचे फळ मोडते. कच्ची पपई कधीच खायला देऊ नये. कारण पपईमध्ये latex ( रबरासारखा पदार्थ असतो) नावाचा घटक असतो आणि त्यामुळे गर्भपात होऊ शकतो. आणि जर तुम्ही म्हणाल की, ‘मग आम्ही पिकलेली पपई खाऊ शकतो’ तेव्हा तुम्ही खाऊ शकता पण यामुळेही प्रसूतीनंतर बाळाला गॅस व पोटाचा त्रास होऊ शकतो.

३) मासे व विशेतः शिजवलेली

असे आढळून आले आहे की, प्रसुतीपूर्व मासे खाणे गरोदर मातेला खूप हानिकारक आहे. याचे महत्वाचे कारण माशांमध्ये  मर्क्युरी नावाचा घटक असतो. आणि हा घटक बाळाच्या मानसिक व शारीरिक वाढीवर परिणाम करतो. काहींना मासे खूप आवडत असतील पण बाळाच्या व स्वतःच्या आरोग्यासाठी काही कालवधीपर्यंत खाण्याचे टाळावे.

४) जंक फूड

गरोदर असताना खूप खाण्याची इच्छा असते, मग त्यात जंक फूड किंवा इन्स्टंट फूड. तेव्हा या अन्नला तुम्हाला टाळता येईल तितके तुमच्या हिताचे आहे. कारण यात तुमचे वजनही वाढते आणि ऍसिडिटी व आतड्याविषयीची समस्या तुमच्या तिसऱ्या त्रैमासिकात येते. त्याऐवजी हिरवा भाजीपाला खावा त्यातून फॉलीक ऍसिड मिळेल व प्रसूती नॉर्मल होईल.

५) हवा किंवा डबाबंद खाद्यपदार्थ

डबाबंद खाद्यपदार्थाने आमचे जीवन सुखकर करण्यास खूप मदत केली आहे. जसे की, फ्रोझन फूड. तेव्हा बाजारातून फ्रोझन फूड आणून फ्रीज मध्ये संग्रहित करून ठेऊ नका. आणि प्रसूतीच्या तिसऱ्या तिमाहीत तर नाहीच. कारण ही पदार्थ preservatives केलेली असतात आणि त्यात काही बॅक्टरीयाचा वापर केलेला असतो ते बाळाला व तुम्हाला हानिकारक आहे. कॅन फूड मध्ये बिसफेनॉल A ( BPA ) हा घटक असतो तो गरोदरपणात अंतःस्राव होऊ शकतो.

ह्या सर्व खाण्यासंबंधी गोष्टीचे पथ्य पाळणे तुमच्यासाठी कठीण आहे, ही गोष्ट मान्य. पण तुमचे व बाळाचे  हेल्थी आरोग्य यापेक्षाही महत्वाचे आहे. तेव्हा काही दिवसासाठी खाणे टाळा.

Leave a Reply

%d bloggers like this: