kapdi-daipar-langot-vaprtana-ya-goshti-lakshat-theva

पूर्वी आपल्याकडे लहान मुलांसाठी कापडी लंगोट वापरात असत. परंतु वापरण्यास सोप्पे आणि धुवायची कटकट नाही म्हणून आपल्याकडे डिस्पोजेबल डायपरच्या वापराचे प्रमाण वाढले. पण आजकाल पर्यावरणाचे भान ठेवून आणि बाळाच्या आरोग्याची काळजी म्हणून बरेच पालक आपल्या बाळांना डिस्पोजेबल डायपर ऐवजी पुन्हा  कापडी डायपर/लंगोटचा जुना पर्याय निवडत आहेत. आजकाल त्यात गरजेनुसार वेगवेगळे बदल करण्यात करण्यात आले आहेत. यासाठी जाणून घेऊयात बाळाला कपड्यांचे डायपर अथवा लंगोट वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यावी-

१) कापडी लंगोट/डायपर

    जर बाळाला तुम्ही कपड्याची लंगोट वापरण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कापडी लंगोटची खरेदी किंवा साठा  करून ठेवायला लागेल. आणि जर नवीन लंगोट आणणार असाल तसेच साधारण डझनभर तरी आणून ठेवावे.नवीन लंगोट वापरण्यापूर्वी  पाण्यातून काढून घ्यावे. त्यामुळे त्याचा कडकपणा जाईल आणि बाळाच्या नाजूक त्वचेला ते टोचणार नाही. जुन्या सुती साडी,ओढणीचे देखील लंगोट बनवता येतात. त्यासाठी ती साडी, ओढणी, स्वच्छ धुवून निर्जंतुक करून  घेणे आवश्यक असते. ( वापरलेले कापड वापरून मऊ झालेले असते आणि ते बाळाच्या नाजूक त्वचेला टोचत नाही).

२) कापडी लंगोट/डायपर वेळच्यावेळी धुवा.

सुरवातीच्या काळात जितकं लंगोट असतील तितके कमीच असतात. त्यामुळे लंगोट वेळच्यावेळी धुवून वळत टाकावेत तसेच कापडी डायपर वेळच्यावेळी ना धुतल्यास त्याला शु-शी चा वास येऊ शकतो . तसेच आयत्यावेळी हे डायपर कमी पडण्यापेक्षा  वेळच्यावेळी धुवून ठेवलेले बरे.

४) कापडी डायपर / लंगोट बदलत राहा

ज्यावेळी डिस्पोजेबल डायपर वापरता बाळाची शू ची आणि शी ची जागा कोरडी राहते.पण ज्यावेळी तुम्ही कापडी  लंगोट वापरता त्यावेळी ते ओले झाल्यावर सतत बदलणे गरजेचे असते. त्याच बरोबर बाळाचे ओले झालेले अंग कोरडे राहील याची देखील काळजी घ्यावी लागते. नाहीतर ओलसरपणा मुळे  बाळाला खाज आणि रॅशेस येण्याची शक्यता असते. कपड्यांचे डायपर वापरताना तुम्हाला बाळाच्या व्यवस्थित स्वच्छता राखावी लागते. 

कापडी डायपर/लंगोट हे बाळासाठी चांगलेच असते पण त्यासाठी स्वच्छता आणि काळजी आवश्यक असते 

Leave a Reply

%d bloggers like this: