आठ-प्रकारची-कुत्रे-बाळाची-मित्र-होण्यासाठी–xyz

एखाद्या लहान कुत्र्याला दत्तक घेऊन त्याला कुटुंबातील नवा सदस्य करता येईल. आणि ही गोष्ट खूप छान असते जेव्हा तुमच्या घरात बाळ आले असेल. कारण बाळाची व त्या लहान कुत्र्याची मैत्री होते. व बाळालाही खेळायला नवा सवंगडी मिळून जातो. जर तुमची कुत्र्याला दत्तक घेण्याची इच्छा असेल तर खाली काही बाळाला अनुकूल व मित्र मानणाऱ्या कुत्र्याच्या जाती देत आहोत.

१) अमेरिकन वॉटर स्पॅनिअल ( American water spaniel )

हा कुत्रा खूप कार्यक्षम असतो. हा मुलाचा शिकारी कुत्रा आहे. हा कुत्रा दिवसभर तुमच्या आजूबाजूला फिरत असतो आणि नेहमी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो. हा कुत्रा जोखीम घ्यायला नेहमी तयार असतो आणि त्याला पाण्यात पोहता येते. खूप चांगला पट्टीचा पोहणारा आहे. हा कुत्रा मालकांबाबत प्रेमळ आहे पण अनोळखी लोकांबाबत काळजी घ्यायची गरज लागेल. ह्या कुत्र्याची निवड चांगली राहील.

२) बसेट हाऊंड ( Basset Hound )

हाही शिकारी कुत्रा आहे. हा कुटुंबातील आवडता प्राणी होण्यासाठी चांगली निवड आहे. हळू पाळतो, हा आळशी असलेला कुत्रा असतो आणि मुखत्वे घरात जास्त. पण हा मालकाच्या बाबतीत खूप प्रमाणिक व समजदार असतो. त्याला जेव्हा हाक मारणार तेव्हा तो लगेच धावत येतो. प्रेमळ आहेच सोबत सभ्यपणा त्याच्यात इतर कुत्रांच्या मानाने खूप आहे. त्याला जर तुम्ही प्रशिक्षण देणार तर तो संयमाने घेत असतो.

३) बीगल (Beagles )

हा कुत्रा वरच्या दोघांपेक्षा लहान आहे. पण खूप ऊर्जा असलेला व लायक प्राणी आहे. हाही बसेट सारखाच आहे. आणखी यांच्यात महत्वाचा गुण म्हणजे हा माणसाशी मानवी नात्याने जोडला जातो. व लहान मुलांना खूप आवडणारा आहे. दिसायला छान आहे.

४) बर्निस माउंटन डॉग ( Bernese Mountain dogs )

हा कुत्रा शांत स्वभावाचा, थोडा मूर्ख आणि थोडा मोठाही आहे. त्याला जेंटल जेन्टस ही म्हणतात. ह्या कुत्र्याला लवकर प्रक्षिशित करता येते. कारण त्यांचे पूर्वज हे शेतीचे काम करायची. हा शेतीचे काम करायलाही उपयोगी आहे. त्याचा मोठा आकार जर तुमच्याकडे छोटे घर असेल तर समस्या येईल पण बाळासाठी चांगला पर्याय आहे.

५) बोस्टोन टेरीज ( Boston Terriers )

हा मूलतः लढाई करणाऱ्या घरातला कुत्रा आहे. त्याचे टोपण नाव ‘द अमेरिकन जंटलमन’’ आहे. जरी ती लढाईसाठी ओळखली जात असली तरी आता त्यांनी सर्व सोडून दिले आहे. खूप प्रेमळ आणि खूप हुशार आहेत. त्यांचा आकार लहान आहे पण तो कधीही थकत नाही. नेहमी आपल्या चपळ हालचालींनी लोकांची लक्ष वेधून घेतो.

६) ब्रिटींनीज ( brittanys )

हा कुत्रा कौटुंबिक आहे. त्याचा स्वभाव प्रेम करणारा आहे. मोठ्या कुटुंबासाठी योग्य निवड आहे. खूप प्रामाणिक व मालकाला कधीच सोडत नाही. याला प्रशिक्षणही देता येतो, त्याच्यासाठी खूप त्रास देत नाही. जर त्याला राग आला तर रुसून बसतो, जेवण करत नाही, एका कोपऱ्यात जाऊन बसून राहतो.

७) द कवलीअर किंग चार्ल्स स्पॅनिअल ( The Cavalier charles spaniel )

हा मूळचा लॅपडॉग आहे. हा बाळावर सतत लक्ष ठेवणारा आहे आणि तितकीच भावासारखी काळजी घेणारा आहे. याचे खूप बारीक लक्ष असते तुम्ही काय करताय व कुठे जाताय. कारण याचे कुटुंबावर खूप प्रेम असते. आणि बाळासाठी चांगला पर्याय आहे.

८) कर्ली कोयटेड रिट्रिव्हर ( Curly -Coated Retriever )

हा कुत्रा सर्व कुत्रापेक्षा हुशार चलाख असतात. त्यांची काळजी घ्यायची गरजही नसते. ही इंग्लंड या देशाची जात आहे. ते सुंदर दिसतात. खूप गंभीर व शांत असतात.

Leave a Reply

%d bloggers like this: