ya-goshtimule-tumchya-natyat-durav-yeu-shakto

 

काही छोटे- छोटे स्वार्थी विचार ज्यामध्ये फक्त स्वतःचा विचार असतो. या विचारांमुळे तुम्ही तुमच्या जोडीदारापासून कायमचे दुरावू शकता. नात्यावर मुलांवर आणि कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. असे विचार आणि अशी वाक्य कोणती ती जाणून घेऊया त्यामुळे ती टाळल्यास तुमचे नाते कायम टिकून राहील.

१. माझा आनंद तिच्या/त्याचा आधी येतो

प्रत्येक जोडप्याच्या नात्यामध्ये आनंद आणि भांडणं  असतात. परंतु तुम्ही यामध्ये दोघांचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार करता. स्वतःच्या इच्छा अपेक्षा दुसऱ्यावर लादता. आपल्या पेक्षा माझ्या या शब्दाला जास्त महत्व देता  किंवा असा विचार करता त्यावेळी ही गोष्ट तुमच्या जोडीदारला दुखावणारी असते आणि हि गोष्ट सतत घडली तर त्याचा परिणाम नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो आणि नाते  तुटू शकते.

२. तुझ्यापेक्षा दुसरं कोणी असतं तर बरं  झालं  असतं

मनुष्य हा फार स्वार्थी आणि हाव  असलेले प्राणी आहे. ज्यावेळी त्याच्याकडे सगळ्यात चांगला जोडीदार असतो त्यावेळी देखील त्याला त्याच्यापेक्षा अजून चांगलं काहीतरी हवं  असते. आणि हि गोष्ट सतत जोडीदाराला बोलत राहणे. त्यामुळे जोडीदार दुस्वास करू लागतो आणि यामुळे तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या नात्यामध्ये दुर्वा निर्माण होऊ शकतो आणि आणि कदाचित स्वतःसाठी दुसरा जोडीदार शोधू लागतो जो त्याला समजू शकेल.

3. आपण एकमेकांसाठी बनलो नाही

जोडीदाराकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा हा विचार मनात आणतात .सिनेमात दाखवतात तसं वास्तवातील नात्यामध्ये नसते. प्रत्येक्षात तुम्हाला आवडतात त्या सगळ्या गोष्टी तुमच्या जोडीदाराला आवडल्याचं पाहिजे अशी अपेक्षा चुकीची आहे. सगळं अगदी कसं  गोड गोड  असें हि अपॆक्षा चुकीची आहे.

५. मी तुझ्याशी लग्न केले आहे, तुझ्या कुटुंबाशी नाही

  हे वाक्य प्रत्येकाच्या जिव्हारी लागणारं  असते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. ज्यावेळी तुम्ही लग्न करता त्यावेळी दोघाच्या कुटुंबाची जबाबदारी दोघांची असते. दोघांनी एकमेकांच्या कुटुंबाला आपलंस करणे गरजेचे असते. परंतु तुम्ही फक्त तुमच्या जोडीदाराशी नातं आहे असं सांगून त्याला/तिला कुटुंबापासून वेगळं करणं  हे  आजकाल बहुतांश नाती दुरावण्याचे मुख्य कारण ठरत आहे. 

६ . माझ्या नवऱ्याने / बायकोने नवरा किंवा बायकोच राहावे मित्र किंवा मैत्रीण होण्याचा पर्यंत करू नये

हा विचार नाते पुढे जाऊच देत नाही कारण प्रत्येक नात्याची सुरवात मैत्रीने होत असता. जर तुमचा जोडीदार तुमची चांगली मैत्रीण/ किंवा तुमचा चांगला मित्र नसेल तर तुमचे नाते पुढे जाऊच शकणार नाही. आणि नात्यात सतत समज  गैरसमज होत

७) एखादी गोष्ट लपवणे

एखादी गोष्ट लपवून तुम्ही तुमचे नाते सुखी ठेवायचा प्रयत्न करत असाल तर हा विचार चुकीचा आहे खोट्याचा आधारावर कोणतेच नाते टिकत नाही. उलट जर तुमचे खोटे जर तुमच्या जोडीदाराला कळले तर तुमच्या नात्यात गैरसमज वाढू शकतात.

 

Leave a Reply

%d bloggers like this: