balala-tharavik-veli-pajane-ani-garjenusar-breastfeeding-tips-in-marathi

बऱ्याच मातांना  हा प्रश्न पडतो कि त्यांनी बाळाला स्तनपान देताना विशिष्ट वेळ पाळणे योग्य आहे की   बाळाच्या गरजेनुसार त्याच्या सूचना लक्षात घेऊन त्याला दुध पाजावे. काहीजणी दुध पाजण्यासाठी विशिष्ट वेळ पाळतात जसे, सकाळी– दुपारी- संध्याकाळी- झोण्यापुर्वी अशा वेळेनुसार किंवा काहीजणी बाळाला भूक लागल्यावर त्याच्या सूचना लक्षात घेऊन स्तनपान देतात.
तुमच्या आयुष्यात तुमचं बाळ आल्यानंतर तुमचा दिनक्रम बदलतो, तुमचे प्राधान्यक्रम बदलतात. यानुसार काही माता बाळाला दुध पाजण्यासाठी एक वेळ ठरवून घेतात आणि त्या वेळेनुसारच बाळाला स्तनपान देतात. याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आणि  साधारणतः कोणती पद्धत योग्य आहे हे पाहूयात.

ठराविक वेळेनुसार दिलेले स्तनपान.

एक विशिष्ठ वेळ ठरवून त्यावेळी दिले गेलेले स्तनपान मातेच्या दिवसाच्या वेळापत्रकानुसार ठरलेले असते. बाळाच्या तात्काळ गरजा किंवा भूक यात ग्राह्य धरली जात नाही. काही वेळा बाळाला भूक लागलेली असू शकते आणि तुम्ही नसल्यामुळे ती भागत नाही किंवा कधी कधी भूक नसताना बाळाला जास्तीचे दुध पाजले जाऊ शकते. यातून बाळाला जेवणाच्या अनियमित सवयी आणि आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या झोपण्याच्या सवयी लागू शकतात. ही पद्धत बाळ मोठे झाल्यावर त्याला फायद्याची ठरत असली तरीही नवजात बालकांसाठी ही पद्धत अयोग्य मानली जाते.

बाळाच्या गरजेनुसार/ मागणीनुसार दिलेले स्तनपान.

ही पद्धत तुमच्या शिशुसाठी अगदी योग्य मानली जाते. अनेक पुस्तके आणि पाश्चात्य संस्कृती याविषयी सहमत नसू शकतात. नवजात बालकांना २४ तासांमध्ये दर २ तासांनी पाजणे आवश्यक असते. असे असले तरी घड्याळ लावून बाळाला पाजू नये, बाळाच्या सूचना आणि त्याची भूक लक्षात घ्या.

तुम्हाला जर वाटले की तुमच्या बाळाला भूक लागली आहे तर त्याला वेळ न बघता पाजा. असे न केल्यास त्याला गरजेपेक्षा कमी किंवा दुध जास्त पाजले जाईल. नवजात बालकांचा आहार जास्त असतो कारण त्यांचे पोट छोटेसे असते आणि आईचे दुध हे लवकर पचते. ठराविक वेळ पळून बाळाला पाजण्याचे नकारात्मक परिणाम घडू शकतात, जसे बाळाला कमी दुध मिळणे किंवा मिळणाऱ्या दुधाचे परिणामकारक उपयोग न होणे इत्यादी.

दुध पाजण्याचे वेळापत्रक बनवणे त्याच्या आरोग्यावर आणि वजनावर देखील परिणाम घडवू शकते.गरजेनुसार पाजणे तुम्हाला सुरवातीला अनियमित किंवा गैरसोयीची वाटू शकते. पण ३-४ महिन्यातच तुम्हाला जाणवेल की तुमच्या बाळाचे दुध पिण्याचे आपोआपच एक वेळापत्रक बनून गेले आहे. त्याला ठराविक वेळेलाच भूक लागते आहे. हे वेळापत्रक काही महिन्यांसाठी असेच राहील आणि जसे जसे बाळ मोठे होईल त्यानुसार काही छोटे छोटे बदल त्याच्या आहार आणि दुध पिण्याच्या वेळेवर घडतात.

गरजेनुसार पाजण्याचे फायदे
बाळाला वेळ ठरवून दुध पाजण्याऐवजी त्याच्या भुकेप्रमाणे स्तनपान देण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तुमच्या बाळाची आय-क्यू लेव्हल म्हणजेच त्याचा बुद्धीगुणांक. एका संशोधनानुसार असे दिसून आले आहे कि ज्या बाळांना त्यांच्या गरजेनुसार स्तनपान दिले गेले आहे त्यांचा बुद्धीगुणांक ठराविक वेळ घेऊन दुध पाजलेल्या बाळांपेक्षा जास्त आहे.
पालकांनी बाळाच्या झोपण्याच्या आणि खाण्याच्या वेळा ठरवून त्यानुसार त्याला पाजणे यापेक्षा योग्य असेच राहील कि त्याच्या वेळा त्याला स्वत:ला ठरवू दया की त्याला कधी काय करायचे आहे. त्यानुसार त्याच्या गरजा लक्षात घ्या, तुमचे बाळच त्याचे नैसर्गिक  वेळापत्रक बनवेल.
तेंव्हा काही गोष्टींना नियंत्रित करण्यापेक्षा त्यांना निसर्गाप्रमाणे आपोआप घडू दिले तर ते योग्यच !               

Leave a Reply

%d bloggers like this: