balasathi-konate-dudh-sarvshresht-aahe

 

ज्या मुलांना स्तनपान देता येत नाही किंवा काही कारणांमुळे अंगावरचे दूध कमी येत नसेल आणि त्याने बाळाची भूक पूर्ण होत नसेल तर काही बाळांना बाहेरचे दूध द्यावे लागते. पण लक्षात घ्या,  बाळासाठी आईचे दूधच महत्वाचे असते. पण स्तनपानही अपुरे पडते कारण या मुलांत लोहाचे प्रमाण व काही आवश्यक घटकांचे प्रमाण कमी पडायला लागते. आणि बाळ  ऍनिमियाची शिकार होऊ शकतात. नंतर जर आईला दूध नसले तर स्तनपानाची सवय लागते. आणि मिळाले नाहीतर मुले चीड-चिडी बनतात. बाहेरचे दूध देण्याची वेळच आली तर काय करायचे ? आणि मातांचेही प्रश्न सुरु होतात की, बाळाला ‘वरच’ दूध कधी देता येईल.  तेव्हा खाली आईच्या दुधाव्यतिरिक्त दुधाचे प्रकार दिले आहेत. ते बाळासाठी योग्य ठरू शकतात.पण हे दुध आपल्या बाळाला पचेल की नाही या विषयी डॉक्टरांना विचारून घ्या. कारण प्रत्येक बाळाची प्रकृती वेगवेगळी असते.

१) गाईचे दूध

या दुधात लोहाची मात्र कमी असल्याने त्यात बाळाची पावडर मिसळून बाळाला पाजतात. या दुधातून बाळाला व्हिटॅमिन बी १२, बि २, कॅल्शियम, आणि मॅग्नेशियम, आणि आणखी प्रोटीन मिळतात. काही माता गाईच्या दुधात पाणी टाकतात त्यामुळे गाईच्या दुधाची पौष्टिक गुणवत्ता कमी होऊन जाते. आणि जर पाणी टाकायचेच असेल तर ते उकळेल असावे. गाईच्या दुधाने बाळाचे दात, स्नायू  इतर अवयव सशक्त होतात. महत्वाचे म्हणजे गाईचे दूध बाळाला पचते. गाईच्या दुधाने बाळाची उंची वाढते. भरपूर फायदे गाईच्या दुधाने होतात.  

२) म्हशीचे दूध

गाईचे दूध बाळासाठी पचायला हलकं असते म्हणून आणतात. पण त्या दुधात ‘बीटा लॅक्टग्लोब्युलिन’ नावाचे प्रथिन आहे. ज्याची पाच टक्के बाळांना ऍलर्जी असते. ते दूध पचत नाही. जुलाब होतात. मग तेव्हा म्हशीचं दूध उकळून, साय काढून, बाळाच्या वयानुसार उकळलेले पाणी मिसळून बाळाला पाजलं तर पचेल.  या दुधात व्हिटॅमिन अ, प्रोटीन, लोह, फॉस्फोरस असतात.

३) फार्मुला मिल्क

काही वेळा आई दिवसभर जॉब करते. किंवा एखादेवेळी तिची प्रकृती बिघडते. तिला आजाराचे जंतू, किंवा जास्त डोस असलेली औषधे आईच्या दुधातून जाऊ शकतात. अशावेळी अर्थातच स्तनपान देता येत नाही. यासाठी फॉर्मुला मिल्क उत्तम पर्याय आहे. बाळासाठी पोषक आहे आणि ते दूध आई घरी नसताना घरातले इतर सदस्य देऊ शकतात. प्रवासात असताना किंवा सार्वजनिक ठिकाणी जर आईला वाटत असेल की, मी इथे स्तनपान करू शकत नाही. त्यावेळी बाटलीतून दूध देता येते. फार्मुला मिल्क तसे महाग असते. पण ते खूप वेळा लागत नाही. पण हे दूध एका वर्षानंतर द्यावे. किंवा डॉक्टरांना विचारून घ्या.

४) प्रक्रिया केलेले दूध

याला पाश्चराईज्ड केलेले दूध असेही  म्हणतात. यात कोणत्याही प्रकारचे बॅक्टरीया नसतात. मोठ्या शहरात पाश्चराईज्ड दूध मिळते तेव्हा त्याचा उपयोगही होतो कारण जर दूध भेसळयुक्त असेल आणि त्यात काहीवेळा रसायने किंवा शरीराला हानिकारक असलेली घटक असतील तर बाळाच्या व मातेच्या आरोग्याला घटक ठरू शकते. यातही तीन  प्रकारचे दूध आहेत.

१. पूर्ण फॅट दूध किंवा पूर्ण क्रीम दूध

हे दूध तुम्ही बाळाला एक वर्षानंतर देऊ शकतात. यासाठी हे दूध बाळाला पचते की नाही त्यावरून तुम्हाला हे दूध देता येईल. काही बाळांना दुधाची ऍलर्जीही असते. तेव्हा या सगळ्या गोष्टी पडताळून निर्णय घ्यावा. कारण डॉक्टर बरीच लोक यासंबंधी सल्ला देत असतात. पण प्रत्येक बाळाची प्रकृती वेगवेगळी असते.

२. सेमी टोन्ड दूध

दोन वर्षानंतर हे दूध द्यावे नाहीतर पाच वर्षेपर्यंत क्रीम दूधच द्यावे.

३. डबल टोन्ड दूध

हे दूध बाळासाठी योग्य नसते, कारण यात कॅलरीज व व्हिटॅमिन्स निघून जातात.

५)  टेट्रा पॅक चे दूध

या दुधाला गरम करायची गरज नसते. व खूप दिवसापर्यंत हे दूध टिकते. तशी त्यावर प्रक्रिया केलीली असते. पण पॅकिंगची तारीख बघून घ्यायची. हे दूध खूप घट्ट असल्याने त्यात थोडे पाणी मिसळून घ्यावे. हे दूध ज्याठिकाणी दुधाची कमतरता असेल त्या ठिकाणी वापर करता येईल. आणि प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकतात.

६) सोया मिल्क

 सोया मिल्क डॉक्टरांशी बोलून घेऊ शकता. कारण इतर दूध बाळाला पचत नसतील किंवा ऍलर्जी असेल तर हे दूध घेऊ शकता.

सहा महिन्यांपुढे पूरक आहार चालू केला तरी दुधाची गरज असतेच. अगदी पूर्ण जेवणाऱ्या वर्ष्याच्या बाळांनीसुद्धा दिवसातून ५००- ६०० मिली दूध प्यायला पाहिजे. वर्ष – दिड वर्षापर्यँत स्तनपान करणारी बाळ भाग्यशाली  म्हणायला हवीत.  

Leave a Reply

%d bloggers like this: