garbhsanskar-thodykat

बाळाचं प्लॅनींग करत असताना जसं बाळाच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन करता किंवा आर्थिक नियोजनाची सुरवात करता, तसं त्याच्या भविष्यात शाररिक आणि बौद्धिक विकास कसा होईल, ते बाळ जगात आल्यावर त्याचे जीवन आरोग्यदायी आणि सुखकर कसे होईल यासाठीचे नियोजन देखील आवश्यक असते. त्यासाठी बाळाचा विचार करयाला सुरवात केल्यापासून ते बाळाची चाहूल लागे पर्यंत आणि बाळाची चाहूल लागल्यानंतर बाळाचा जन्म होईपर्यंत गर्भवती म्हणजेच बळावर संस्कार करण्याची गरज असते.

बाळाचा विचार करायला सुरवात केल्यावर त्या जोडप्याने आपल्या आहार आणि दिनचर्येत थोडासा बदल करणे गरजेचे असते. यासाठी खूप काही करण्याची गरज नसते. यामध्ये पूर्वी जसे सांगितले जायचे चारीठाव जेवावे. सगळी जीवनसत्वाचा आहारात समावेश होईल असा आहार घ्यावा. जेवण वेळच्यावेळी करावा. खूप जागरण करू नये. दिवसभरातून थोडातरी व्यायाम करावा. जंकफूड,फास्टफूड टाळण्याचा प्रयत्न करावा. योग्यप्रमाणत पाणी प्यावे. आहारबाबत काही शंका असल्यास किंवा विशेष काही समस्या असल्यास ( जसे डायबिटीस ,थायरॉईड )डॉक्टरांच्या सल्ल्याने आहाराचे नियोजन करावे.

    गर्भसंस्कार 

जशी बाळाची चाहूल लागते तसे आपल्या बळावर (गर्भावर) संस्कार कसे करावे असा प्रश्न अनेक जणांना पडतो. याबाबत जागरूकतेने विचार करणे किंवा कृती करणे गरजेचे असते. सगळेच जातात म्हणून एखाद्या गर्भसंस्कार क्लासला जाणे. कोणतेही गर्भसंसस्कारचे पुस्तक वाचून तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कृती करणे धोकादायक ठरू शकते. गर्भसंसस्कार म्हणजे काय हे जाणून घेऊन उमजून घेऊन आचरणात आणण्याची कृती आहे. तसेच याबाबतची पुस्तके घेताना क्लास लावताना किंवा या बाबत वाचन करताना काळजी घ्यावी. काही शंका वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आईचा आहार विहार 

थोडक्यात सांगायचे झाले  तर गर्भसंस्कारात मुख्यत्वे बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी आईचा आहार ,विहार कसा असावा हे लक्षात घेतले जाते.तसेच तुमचा आचार- विचार वागणे बोलणे याचा देखील विचार कारण्यात येतो. यामध्ये बाळाच्या दृष्टीने आणि तुमच्या शरीराला अवश्य असणारा व्यायाम आराम आणि बाळाच्या सर्वंगीण विकासासाठीची विविध पोषणमूल्ये /औषधे , सकस आहारयाचा समावेश होतो.

आईचा बाळाशी संवाद 

बाळ (गर्भ) पोटात वाढत असताना. आईने त्याचाशी संवाद साधायचा असतो. आईने बाळाशी आपल्या मनातील विचार बोलून दाखवावे (प्रसन्न आणि सकारात्मक विचार). बाळाला म्हणजे तुम्हला आवडतील असे पदार्थ खावे, वेगवेगळ्या विषयाचे वाचन म्हणजेच, साहस कथा, विविध आदर्श व्यक्तिमत्वांची चरित्रे, विनोदी कथा होय. या काळात तणाव निर्माण करणाऱ्या गोष्टी टाळाव्या. मनाला त्रास होईल अश्या विषयावर चर्चा करणे टाळावे. तज्ज्ञांचं सल्ल्याने काय खावे काय नाही हे जाणून घ्यावे. तसेच कोणत्या प्रकारचा व्यायाम ,योगासने करावे याची माहिती करून घ्यावी. विविध प्रकारचे शांत संगीत, राग ऐकावे. याबाबत देखील आजकाल तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो .आणि हे आजकाल सहज उपलब्ध देखील होत आहे.या काळात एखाद्या गोष्टीचा केलेला सखोल अभ्यास किंवा वाचन देखील बळावर परिणामकारक ठरू शकते.

दिनक्रम 

आजच्या धकाधकीच्या जीवनात या गोष्टी आचारणात आणण्यासाठी बाळावर योग्य संस्कार होण्यासाठी यासाठी आपला दिनक्रम आखावा. कामाचा ताण जास्त असेल तर थोडे दिवस ब्रेक घ्यावा आणि शक्य नसल्यास कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा. कारण आज यात तडजोड केली तर त्याचे परिणाम तुम्हाला आणि तुमच्या बाळाला भविष्यात भोगावे लागतील

Leave a Reply

%d bloggers like this: