lahan-balashee-kase-bolave-v-ka-bolave

तुम्हाला वाटत असेल की, आपले बाळ बोलत नाही, गप्पा मारत नाही, पण ही गोष्ट खोटी आहे. खरं म्हणजे नवीन जन्म झालेले बाळ प्रत्येक वेळेला तुमच्याशी बोलत असते. आणि या संवादाला रडणे म्हणतात. कारण बाळ रडण्यातून सांगत असते त्यांना काय हवे आणि काय वाटते. ते रडतात कारण त्यांना भूक लागली असते, तहान लागलेली असते. तुमचे बाळही तुमच्याशी बोलत असते. बाळ खूप अस्वस्थ असते आणि तुमच्या कडेवर आले शांत होते. कारण तुम्ही त्याला कडेवर घ्यायला हवे. म्हणजे बाळ तुमच्याशी बोलतो.

काही संकेत बाळ त्याच्या भाषेत देतो.  

१. जांभई देत असेल, मूठ डोक्यावर ठेवत असेल, झोपेची गुंगी आणणारी डोळे याचा अर्थ : मला झोप लागत आहे.

२. तोंड पुन्हा-पुन्हा उघडत असेल : मला भूक लागली आहे.

३. विस्फारून बघत असेल आणि शरीराची हालचाल वेगाने करत असेल : मी खेळण्यासाठी तयार आहे. आणि शिकण्यासाठी.

४. जर डोकं खांद्याच्या पाठीमागे घेत असेल किंवा मान हलवत असेल : नको मला, आभारी आहे.

पालकांनी बाळाच्या डोळे, मान, डोकं, यांच्या सूक्ष्म हालीचालीवरून ते काहीतरी बोलत आहेत. हे ओळखायला हवे. व त्याचा अभ्यास केलाच तर त्याचे व्यक्तिमत्व समजून येईल.

बऱ्याच पालकांना लहान बाळाशी बोलायला मूर्खपणाचे वाटते. पण जर तुम्ही बाळाशी बोलणार तो कुशीत जास्तीत जास्त  शारीरिक, मानसिक, विकसित होणार.     

ह्या गोष्टी तुम्ही बाळासाठी करू शकता :

१. तुमच्या बाळाला तुमचे डोळे व तुमचे तोंड ओढायला आवडतात.

२. बोला त्याच्याशी की, तो काय करत आहे.  उदा. “ अरे तुझी अंघोळ केली कसं वाटतंय तुला ! पाणी थंड होते की गरम. तुला अंघोळ करायला आवडते का ? कोणत्याही भाषेत बोला, त्याला बाळ प्रतिसाद देईल.

३. बाळासाठी काहीतरी गाणे म्हणा, कविता म्हणा जरी तुमचा आवाज चांगला नसेल.

४. जर तुम्ही वाचन करत असाल ते त्याला सांगत रहा. ऐतिहासिक वाचत असाल तर त्याला तशा कृती करून दाखवा. त्याच्यावर चांगला परिणाम होईल.

५. या गोष्टी करताना त्याचाही आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा.

जर तुमचा बाळ प्रतिसाद देत नसेल तर घाबरू नका. प्रत्येक बाळ स्वतःप्रमाणे वेळ घेत असतो म्हणून लगेच घाबरून आपला बाळ बोलत नाही प्रतिसाद देत नाही. अशी समजूत करून त्रास घेऊ नका. हळूहळू तो बोलायला लागेल, प्रतिसाद देईल. अगोदर त्याच्याशी बोलायला, गप्पा मारायला लागा. आणि या आठवणी तुम्हाला आयुष्यभर पुरतील.

Leave a Reply

%d bloggers like this: