patnichya-strechmark-baddal-patichi-mate

प्रत्येक आईला स्ट्रेच मार्कला ( प्रसूती नंतर पोटावर, ओटी पोटावर, कमरेवर उठणारे व्रण) सामोरे जावे लागते  हे व्रण नैसर्गिक असतात. तरीही काही मतांच्या मनात त्याबद्दल न्यूनगंडाची भावना निर्माण झाली असते. या व्रणाबाबत आपले पती काय विचार करतील. याबाबत देखील त्यांना न्यूनगंड वाटत असतो. या स्ट्रेच मार्क मुळे आपल्या पतीला आपल्याबद्दल वाटणारे आकर्षण कमी तर होणार नाही याची भीती त्यांना सतावते.

परंतु या बाबत काही पतींनी आपली मते नोंदवली आहेत आणि ती काय आहेत ते आता आपण जाणून घेऊ.

१. व्यक्ती आणि तिचे व्यक्तिमत्व  महत्वाचे

स्ट्रेचमार्कचा मला काही फरक पडत नाही. मला ती व्यक्ती म्हणून आवडते आणि चे व्यक्तिमत्व माझ्यासाठी महत्वाचे आहे.

२) तिच्यात सच्चेपणा आहे आणि तो मला भावतो

माझ्या बायकोच्या कमरेवर स्ट्रेचमार्क आहेत. त्याबाबत मला कधी-कधी वेगळं वाटतं पण त्यापेक्षा मला तिच्यातला सच्चेपणा मला भावतो. तिच्यातली अपूर्णता तीला आणि आमच्या नात्याला पूर्णतः आणते. त्यामुळे हि गोष्ट माझ्यासाठी महत्वाची नाही.

३. ती वाघीण आहे.

माझ्या बायकोला ते स्ट्रेचमार्क आमच्या मुलीमुळे आले आहेत. त्यामुळे ते मला आवडता. आणि ते मला  वाघिणीच्या अंगावरील पट्ट्यासारखे भासतात.

४. ती अजूनही सुंदर आहे

आम्हाला दोन मुलं  आहेत आणि तिचा पोटावर बरेच स्ट्रेचमार्क आहेत. आणि मी तिला सांगितले आहे की  ती  मला खूप आवडते. आणि खरं सांगायचं तर ती खरंच खूप सुंदर आहेआणि मला तिच्या त्या व्रणाचा काही फरक पडत नाही. .

५. ती माझ्यासाठी कायमच सुंदर असणार आहे.

गरोदरपणात माझ्या बायकोचे वजन वाढले आहे तिच्या पोटावर स्ट्रेच मार्क देखील आले आहेत . पण मला नेहमी वाटते की  ती खुप  सुंदर आहे आणि तिने तिची हि सुंदरता माझ्या नजरेतून पाहण्याची गरज आहे. आणि ती माझ्यासाठी कायम सुंदरच असणारा आहे.

६. स्ट्रेचमार्क हे फारच वैशिष्ठपूर्ण अश्या खुणा आहेत

.माझ्या बायकोचे स्ट्रेच मार्क हे  खुणा आमच्या सुंदर मुलांच्या खुणा आहेत आणि या फारच वैशिष्ठपूर्ण अश्या खुणा आहेत

७. मी तिच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात आहे

माझ्या बायकोला पोटावर स्ट्रेच मार्क आहेत. ती त्यांना झाकण्याचा आणि घालवण्याचा प्रयन्त करते पण पण मला त्याची काही पर्वा नाही. आणि माझं तिच्या व्यक्तिमत्ववर प्रेम आहे तिच्या शरीरावर नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: