saha-mahinyacha-balacha-mansik-vikas

 

बाळाच्या जीवनात पहिल्या वर्षांना खूप महत्व असते. मग त्यात त्याची मानसिक वाढ, शारीरिक वाढ, या गोष्टी सुरुवातीच्या दिवसात महत्वाच्या असतात. कारण त्यानंतरच त्याचे व्यक्तिमत्व बनत असते. पहिले सहा महिने खूप काळजीपूर्वक पोषण करायचे असते. तुमचे बाळ पहिल्या सहा महिन्यात त्याच्या आजूबाजूच्या लोकांना ओळखू लागते. त्याला आवाजाची समज नसते पण त्याचे कुतूहल जागृत व्हायला लागते. सुरुवातीला बाळ त्याच्या आईचा आवाज ओळखायला लागतो.  त्यानंतर वासाची जाणीव, स्पर्शाची अनुभूती ह्या गोष्टी हळूहळू त्याला अवगत व्हायला लागतात.

त्यानंतर पुढच्या महिन्यापासून म्हणजे साधारणतः२ महिन्याच्या पुढे कोणी हसले तर त्यालाही हसून उत्तर द्यायला लागते. आणि आता तो कुतूहलाने डोळे मोठे करून वातावरणातल्या इतर गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला लागतो. तुम्ही जर बाळाच्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट धरून ठेवली तर बाळ ती वस्तू निरखून पहाते व समजण्याचा प्रयत्न करते, यावेळी त्याची दृष्टी विकसित झाली नसते तरीही तो कुतूहलाने समजण्याचा प्रयत्न करतो. तीन महिन्यानंतर त्याच्या समजून घेण्यात प्रगती होऊन तो तुम्हाला प्रतिक्रिया देऊ लागतो.

४ महिन्याला, त्याच्यासमोर थोड्या अंतरावर वस्तू ठेवली तर तो तिला पकडण्यासाठी रांगायला लागतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बाळ प्रत्येक वस्तू, गोष्ट त्याच्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो. बाळ आता त्याची बोट फिरवून स्वतःच्या शरीरातल्या अवयवांनी स्वतःला चालवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे रांगणे, पकडणे, इ.

६ महिन्यात, त्याला भाषा थोडी- थोडी यायला लागते, त्याचा पहिला शब्द मम् किंवा ममी असतो. मधेच तो काहीतरी आवाज काढतो आणि हसतो याचा अर्थ तो तुम्हाला काहीतरी सांगतोय.

काही बाळांची सहा महिन्याची वाढ अशी होणार नाही. कारण काही बाळांची प्रकृती नाजूक असते. पण साधारणतः बाळाची वाढ अशीच होत असते.  याच्या पुढच्या लेखात बाळाचा शारीरिक विकास यावर सांगू.

Leave a Reply

%d bloggers like this: