tumachya-hya-saha-goshti-phakt-navryalach-mahiti-asatat

कुटुंबव्यवस्था आजही भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि लग्न कुटुंबव्यवस्थेचा कणा. मग ते लग्न प्रेमविवाह असो की अरेंज. जेव्हा जोडीदार एकमेकांच्या बंधनात अडकल्यानंतर ते एकमेकांबाबत जाणून घ्यायला लागतात, एकमेकांकडून शिकतात, किंवा एकमेकांना शिकवतात. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात. ह्या सहा गोष्टी फक्त तुमच्या नवऱ्यालाच माहिती असतील.

खाली दिलेल्या या ६ गोष्टी फक्त तुमच्या नवऱ्याला तुमच्याबद्धल माहिती असतात.

१) तुमचे  Passion

ज्यावेळी तुम्ही एकमेकांशी गप्पा मारता तुमच्या गप्पातून तुमचे पॅशन (passion) नवरा बरोबर ओळखतो. कारण पती हे तुमच्या कल्पनेपेक्षाही हुशार असतात. काही वेळा पती हे तुमच्या विचारांपेक्षा हुशार असतात. नवऱ्याला माहिती असते की, तुम्ही जेव्हाही कुटुंबासाठी व मुलांसाठी जॉब सोडता तेव्हा तुमचा त्याग ते कधीही विसरत नाहीत.

२) तुमच्या भावना समजून घेतो

खूप लोकांना वाटते की, जर बायकोने हसून उत्तर दिले किंवा तिने हसून दिले तर ती ठीक आहे. पण नवऱ्याला बायकोचा स्वभाव माहिती असतो म्हणून तो ओळखून घेतो की, तुम्हाला त्या गोष्टी आवडल्या नसतील किंवा मान्य नसेल. त्यांना हेही माहिती असते की, तुम्ही कोणत्या गोष्टींनी आनंदी होतात आणि कोणत्या गोष्टींनी दुखी होतात. तुम्ही त्यांच्यापासून कितीही तुमच्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला, त्याचा काहीच उपयोग होत नाही. कारण तुमचा चेहरा पाहिल्यावर त्यांना साऱ्या गोष्टी कळून जातात.  

३) तुमचा आनंद

तुम्हाला दुखी बघायला त्याला मुळीच आवडत नाही. ही गोष्ट बहुतेकदा तुम्ही जाणून घेत नाही. कारण तो कधीच उघडपणे दाखवत नाही. पण ह्यासाठी तो तुमच्या आवडीचा पदार्थ खाण्यासाठी घेऊन जातो. किंवा तुम्हाला जे सहलीचे ठिकाण आवडते त्या ठिकाणी फिरायला घेऊन जातो. म्हणजे तुम्हाला ज्यांनी आनंद मिळेल त्या गोष्टी तो करायला बघतो. कधीतरी तुमची आवडीची पाणीपुरी खायला घेऊन जातो. तो तुमचा आनंद जाणून असतो.  

४) तुमची स्पेस

कधी – कधी तुम्ही खूप कंटाळून जातात. संसार, मुले, त्याच – त्याच गोष्टी. तेव्हा तुम्हाला संसाराचा कंटाळा वाटू लागतो. हीच गोष्ट नवरा ओळखून घेतो आणि तुम्हाला स्पेस देतो. तुमच्या इच्छेच्या गोष्टी करू देतो आणि त्यात कधीच हस्तक्षेप करत नाही. मग तुमच्या कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींना भेटणे, किंवा माहेरी खूप दिवस राहणे. तुमची स्पेसचा तो आदर करतो.

५) तुमच्या मर्यादा

नवऱ्याला तुमच्या स्वभावाची ओळख असल्याने त्याला माहिती असते की, तुम्हाला कधी राग येतो त्यानुसार तो तुमच्याशी बोलत असतो. स्वारी रागात असेल तर शांत कसे करायचे याचेही त्याला तुमचे  वीक पॉईंट माहिती असतात. तुमच्याकडून काही पाहिजे असेल तेव्हा कसे लाडिकपणे बोलायचे हेही त्याला ठाऊक असते. उदा. पैसे मागायचे असतील त्यावेळी.

६) तुमचे भय

तुम्हाला अंधाराची किंवा भुताची भीती वाटते ही गोष्ट नवऱ्याला ठाऊक असल्यामुळे तो तुम्हाला रात्री एकटे सोडत नाही. कितीही छोट्या गोष्टीला तुम्ही घाबरत असाल तर तो तुम्हाला मूर्ख समजत नाही. उलट हसतो कारण तेवढे त्याचे तुमच्यावर प्रेम आहे. आणि तुम्ही त्याच्यासाठी बेस्ट आहात.  

हॅलो मॉम्स… आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया… हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Leave a Reply

%d bloggers like this: