tumchya-rahnimanachi-padhat-tumhi-ekhadya-mulachi-aai-aslyache-sangte-ka

प्रत्येकाची राहणीमानाची एक पद्धत असते,प्रत्येकाचे आप-आपले प्राधान्यक्रम असतात. प्रत्येकजण सारखे कपडे घातल्यावर सारखे दिसत नाही आणि प्रत्येकाची कपड्याची आवड देखील सारखी नसते. पण काही सवयी, काही राहणीमानाच्या पद्धती, कपड्याची आवड तुम्ही एखाद्या मुलाचाही आई असल्याची ओळख करून देण्यासाठी पुरेश्या असतात त्या कोणत्या ते आपण पाहणार आहोत..

१. प्रमाणापेक्षा मोठी बॅग

तुम्ही जर एखाद्या बाळाची/मुलाची आई असाल तर तुम्ही ज्यावेळी बाहेर जात त्यावेळी तुमच्याकडे नक्कीच एक मोठी बॅग असते. कारण त्यात तुम्हाला आणि तुमच्या मुलाला लागणाऱ्या सगळ्या गरजेच्या वस्तू असतात. आणि त्या तुम्हाला तुमच्या हाताशी हव्या असतात. आणि त्या बागेची तुम्हाला सवय होते.

२. केस बांधायची पद्धत

             तुम्हाला तुमचे केस पटकन वरती बांधायची सवय असते. खूप वेळ केसाची स्टाईल करत बसण्यापेक्षा ही  पद्धत तुम्हाला सुटसुटीत आणि आरामदायक वाटते. तसेच तुम्हाला तुमचे केस विस्कटण्याची काळजी नसते. कारण तुम्ही कितीही व्यवस्थित केस बांधले तरी तुम्हाला जर बाळ असेल तर ते केस विस्कटणारच असतात.

३. तुमचा मेकअप पटकन होतो/ तुम्हाला आवरायला जास्त वेळ लागत नाही.

तुम्हाला लहान मुल असतं  त्यावेळी तुमचा मेकअप करायला किंवा तुमचे स्वतःचे आवरायला फारसा वेळ लागत नाही. आणि तशी तुम्हाला तुमच्या मेकअप ची काळजी देखील नसते. कारण लवकरच तुमचा मेकअप बिघडणे असतो हे तुम्हाला माहिती असते. तसेच आई झाल्यावर तुम्ही कमीत कमी मेकअप करण्यावर भर देता

४. स्टाईल पेक्षा आरामदायक कपड्याला पसंती (comfortable cloth )

मुल झाल्यानंतर  बहुतांशी आया या  कोणते कपडे घालावे याबाबत गोंधळलेल्या असतात. कारण गरोदर असण्या अगोदरचे कपडे हे फारच घट्ट होत असतात आणि गरोदर असतानाचे कपडे फारच ढगळ होत असतात. आणि  त्या ढगळ आरामदायक सुती कपडे घालण्याला पसंती देतात.  

५. उंच टाचेच्या चप्पला

तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या मागे पळायचे असेल,त्यावेळी तुम्ही कोणत्या प्रकारच्या चप्पलेला पसंती द्याल. उंच टाचेच्या की सपाट टाच असलेल्या. अश्यावेळी उंच टाचेच्या चपलांना सुट्टी द्याल. त्यामुळे लहान मुल असेलली आई नेहमी कमी टाचेच्या किंवा अनवाणी वावरताना दिसते.

असे सगळे असले तरी काही तुम्ही बाहेर जाताना लगेचच पुर्वी बाहेर  जायचा तसंच जायला हवं असं काही नाही. तुमची सध्या जबाबदारी वाढल्यामुळे  आणि ती पेलण्याची शक्ती फक्त तुमच्यकडे असल्यामुळे हे शक्य होत नाही. तुम्हाला जेव्हढे  शक्य तेवढे तुम्ही तयार होऊन बाहेर जात असता त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका. आणि कोणी काही बोललं तरी त्याची काळजी कशाला करायची तुम्ही एक स्वतंत्र आणि जबाबदार स्त्री आहात. हेच तुमचे खरे सौंदर्य आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे कपडे घातले तरी तुम्ही सुंदर आणि स्टायलिश दिसता.

 

 

 

Leave a Reply

%d bloggers like this: