balala-dudh-kase-pajave

 

सुरुवातीला बाळ दूध खूपच कमी पिते पण नंतर थोडय़ाच दिवसांत ३० ते ६० मिली दूध पिऊ लागते. दुधाचा पहिला भाग पातळ, तहान भागवणारा असतो. नंतरचा भाग दाट, उष्मांक असलेला, स्निग्ध आणि भूक भागवणारा असतो. स्तनपान बाळाला सुखकारक आणि सुलभ होण्यासाठी आईने काळजी घ्यावी. अगोदर बाथरूममध्ये जाऊन यावे, भरपूर पाणी पिऊन घ्यावे,  पाठीला आणि कमरेला आधार व आराम वाटेल अशा उशांना (pillow) टेकून बसावे. जर तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर तुमच्या पायाखाली छोटेसे स्टूल घ्या. मांडीवर उशी घेऊन बाळाला त्यावर पूर्ण स्वत:कडे वळवून घ्यावे. यासाठी आता बाजारात विशिष्ट नर्सिग पिलोसुद्धा मिळतो. स्तनाग्रावर बाळाला व्यवस्थित घ्यावं.

बाळाला व्यवस्थित दूध पिता येईल त्यासाठी कशी शरीररचना करता येईल ही गोष्ट अनुभवी सुईणी, घरातील ज्येष्ठ स्त्रिया यांची मदत घ्यावी. बाळाला दूध पाजणे एक तंत्रच आहे. आणि हळूहळू तुम्हाला जमू लागेल.

प्रत्येक बाजूला १० ते १५ मिनिटे घ्यावीत. एका बाजूला पिऊन झाल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढावी. दुसऱ्या बाजूनंतर पुन्हा तसंच करावं म्हणजे बाळाला दूध नीट पचून, वर येत नाही किंवा पोट दुखणार नाही. दूध पिता- पिता बाळ मधेच झोपुन जाते. त्याला हलकी चापट मारून जागे करून घ्यावं. बाळ जर चुकीच्या पोझिशनने दूध प्यायला लागले तर आईला त्रास होऊ शकतो.  

नवजात बाळ दिवसातून ८ ते १२ वेळा किंवा जास्त वेळाही दूध पिऊ शकतो. प्रत्येक वेळी ३० ते ४० मिनिटं. आईने दूध पाजण्याव्यतिरिक्त फक्त स्वत:चं खाणंपिणं आणि विश्रांती एवढंच करायचं आहे. मुख्य म्हणजे यासाठी भरपूर वेळ आणि संयम बाळगावा. कारण आई बाळ दोघेही नवीन आहेत.  सुरुवातीला अडचणी आल्या तरी हळूहळू जमतं. दूध भरपूर यावं म्हणून आपल्याकडे काही पारंपरिक गोष्टींचं सेवन करायला सांगतात- शतावरी, मेथी, डिंक, खसखस, हळीव इत्यादी. पण त्याहून महत्त्वाचं आहे तीन वेळा ताजं जेवण, दूध, भरपूर पाणी आणि तणावरहित मानसिकता.

स्तनपानाचे फायदे  हळूहळू आईला दिसू लागतात.  आईसाठी चांगली गोष्ट म्हणजे रोज किमान ५०० कॅलरीज जाळल्या जातात. गरोदरपणात  वाढलेलं वजन झपाटय़ानं कमी होत. गर्भाशय पूर्वीच्या आकाराला परत येतं. मासिक पाळी लवकर सुरू होत नाही. त्यामुळे नैसर्गिकपणे संततीनियमन होतं. पुढच्या आयुष्यात स्तनांचा, ओव्हरीजचा कॅन्सर आणि हाडं ठिसूळ होणे.  यापासून संरक्षण मिळतं. यातून महत्त्वाचा फायदा म्हणजे या अत्यंत निकटच्या संबंधांमुळे आई-बाळात एक अतूट बंधन निर्माण होतं.

आईच्या दुधावर बाळाची वजनवाढ चांगली होते. त्याला जुलाब किंवा ‘खडा’ होणं हे दोन्ही त्रास कमी होतात. अ‍ॅलर्जी, इसब, दमा यांची शक्यता कमी असते. कान, छाती किंवा पोटाचा जंतुसंसर्ग कमी होतो. अशा बाळांचा बुद्धय़ांकसुद्धा चांगला असतो. मोठेपणी स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा रोगांची शक्यताही कमी असते.

याखेरीज स्तनपान खरोखर फार सोयीस्कर आहे. हवं तेव्हा, हवं तितकं,  बाटल्या किंवा इतर गोष्टींचं र्निजतुकीकरण हे काम वाचतं. फॉम्र्युला किंवा वरच्या दुधाचा खर्च कमी येतो. आजारपण कमी असल्यानं वैद्यकीय खर्चपण वाचतो. ज्या आईला कामासाठी बाहेर जायचंय तिला ‘ब्रेस्ट पंप’चा पर्यायही उपलब्ध आहे.

अर्थात स्तनपानाचे फायदे वाचून असं वाटू नये की स्तनपान जमलं नाही तर बाळाचं फार मोठं नुकसान होणार. आणि जर तुम्हाला तसे वाटत नसेल तर स्तनपानसाठी काय खावे याविषयी मागे आम्ही लेख दिले आहेत वाटल्यास ते बघू शकता. नाहीतर बाळाला स्तनपान मिळाले नाही तर आईच जबाबदार राहील.  

आज बाजारात नवीन उत्पादनामुळे नवीन आई-वडील स्तनपान पेक्षा त्या उत्पादनाला महत्व देतात पण आईचं दूध म्हणजे बाळाचं सर्वागीण पोषण.

Leave a Reply

%d bloggers like this: