garodar-asatana-kahi-padarthancha-vas-ka-sahn-hot-nahi

गरोदरपणात काही अन्नपदार्थांचा वास तुम्हाला खूप तिरस्करणीय वाटतो. ज्यावेळी अशा अन्नपदार्थांचा वास येतो तेव्हा तुम्ही तिथे उभेही राहू शकत नाही. लगेच तुमचे डोकं दुखायला लागत. काहींना यामुळे अर्धशिशीचासुद्धा त्रास व्हायला लागतो. ( जर अर्धशिशीचा त्रास असेल तर).  ही समस्या सामान्यतः सर्वच गरोदर मातांना असते.

ही गरोदरपणाची लक्षणे असतात म्हणून हा त्रास होतो. आणि हा त्रास मुखत्वे पहिल्या त्रैमासिकात होतो. म्हणून तुम्ही त्याबद्धल खूप काळजी करण्याची करण्याची आवश्यकता नाही. पण तुम्हाला त्याबद्धल जाणून घ्यायचे असेलच. आणि ते तुम्ही जाणून घ्यायला हवेच.

गरोदरपणामुळे तुमच्या शरीरात बदल होत असतात. जर अशा गोष्टीमुळे तुम्हाला खूपच त्रास होत असेल तर त्यावर काय उपाय करता येईल. तुम्ही “Human chorionic gonadotropin (HCG) याच्याबद्धल ऐकलेय का ? हे एक संप्रेरक आहे आणि ह्या संप्रेरकामुळे तुम्हाला आवडणाऱ्या जेवणाबाबतही अचानक तिरस्कार वाटायला लागतो. कारण त्या अन्नाचा वास तुम्हाला सहन होत नाही.  (Hcg ) हे संप्रेरक जेव्हा गर्भाशयात गर्भ वाढत असताना ते नाळेतुन तयार होते.  

तुम्ही जेव्हा प्रसूती चाचणी करता प्रेग्नन्सी टेस्ट स्ट्रीप ने तेव्हा गर्भधारणा आहे कळल्यावर हे संप्रेरकाची सुरुवात होऊन जाते. आणि ह्या संप्रेरकामुळंही तुम्ही गरोदर आहात असे ओळखता येते. यासाठी हा हार्मोन तुमच्या गर्भधारणेदरम्यान कसा बदल घडवितो.    

 ११ आठवड्यांच्या प्रसूती दरम्यान Hcg हे संप्रेरक आपल्या शरीरात काहीतरी चढ-उतार करत असते. आणि नंतर पहिल्या त्रैमासिकाच्या शेवटी त्याचा त्रास खूप जाणवू लागतो. आणि बदलांमुळे वासाची तीव्र नावड तयार होते.

तुम्हाला मळमळ व्हायला लागते. बऱ्याचदा ह्यामुळेही असा त्रास होत असतो. म्हणून तुम्ही मसाल्याचे पदार्थ, अंडी, आणि मांसाहार टाळायला हवा या दिवसांमध्ये. काही स्त्रियांना बर्फ, केस, व खडू किंवा आणखी वेगळी पदार्थ खायची इच्छा होते. विचित्र पदार्थ खाण्याची इच्छा असेही या हार्मोनल बदलामुळे वाटते. म्हणून असे वाटत असेल तर डॉक्टरांशी याबद्धल बोलून घ्या. आणि या गोष्टी  सामान्यतः गरोदरपणात होत असतात. म्हणून त्याची लाज किंवा चिंता करू नका.

Leave a Reply

%d bloggers like this: