pesifyer-chusni-vaprnyache-dushparinam

जरी पेसिफायर (चुसनी) वापरल्याने होणारे दुष्परिणाम आपल्या सर्वांना ज्ञात आहेत तरीही काहीजण या माहितीला पुर्णपणे दुर्लक्षित करून आपल्या लाडक्या बाळाला शांत करण्यासाठी या चुसनीचा उपयोग करताना दिसतात. सर्वच डॉक्टर या पेसिफायरच्या वापराच्या  विरोधात पालकांना वेळोवेळी सजग करत असतातच. यासंबंधी याचे तोटे समजून घेणे आवश्यक आहे. 

एक गोष्ट लक्षात ठेवा की बाळ मोठे होणार आहे तसतसे त्याला त्याची ही सवय मोडणे अपरिहार्य आहे. कधी ना कधी ते सहाजिकच सुटायला हवे म्हणूनच तुमचे बाळ त्यावर अवलंबून होण्याआधी त्याची पेसिफायर वापरण्याची सवय मोडणे आवश्यक आहे.

१) उच्चारांवर परिणाम.  

जास्त काळ याचा वापर केल्यास बाळाच्या उच्चारांवर परिणाम होऊ शकतो. चुकीच्या मापाची चुसनी दिल्यास बोलणे व उच्चार बिघडतात. नेहमी नेहमी ही चुसनी तोंडात देऊन बाळाला शांत करण्याऐवजी आईने इतर पर्याय शोधले पाहिजेत, जेणेकरून बाळाला त्याची सवय लागणार नाही.

२)  बाळाचे संगोपन

काही पालक पेसिफायरवर इतके अवलंबून होऊन जातात की त्याला भुक लागली असेल तरीही पेसिफायर चोखायला देतात, हे पुर्णपणे चुकीचे आहे. पेसिफायरमुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होता. काही पालक शिशूला नको असेल तरीही बळजबरीने बाळाला चुसनी तोंडात देतात, ही अयोग्य पद्धत आहे. बाळ रडायला लागले की त्याला चुसनी तोंडात द्यायची पालकांना सवय लागते, यामुळे त्याला भूक कधी लागली आहे हे आई ला कळू शकत नाही. याहून अधिक या सवयीमुळे बाळाला पुरेसे स्तनपान देताना आईला त्रास होऊ शकतो. हो, पेसिफायर बाळाच्या दुध पिण्याच्या क्रियेमध्ये अडथळे आणू शकते. बाळाला पुरेसे दुध मिळणे बंद होऊ शकते कारण पेसिफायरच्या सवयीमुळे त्याला मातेचे स्तनाग्र नकोसे वाटतात आणि त्याच्या पुरेसे दुध पिण्यात खूप वेळ लागू शकतो. 

३) ऐकण्यावर प्रभाव 

पेसिफायर चा सलग वापर तुमच्या बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम घडवू शकतो. यामुळे कानामध्ये इन्फेक्शन (संक्रमण) होऊ शकते. डॉ. हौक यांच्या मते पेसिफायर वापरणाऱ्या बाळांपैकी २९% बाळांना कानाच्या इन्फेक्शनला सामोरे जावे लागते. याचे कारण असे की, पेसिफायर चोखताना अंतर्गत दाब कमी होतो. या इन्फेक्शनचे योग्य वेळी उपचार केले नाहीत तर शिशूच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतात. जर तुम्ही पेसिफायर चा वापर पूर्णपणे थांबवू शकत नसाल तर कमीतकमी हा वापर सलग किंवा खूप काळासाठी नाही होणार याची स्वत:हून काळजी घ्या. 

३) दात खराब होणे.  

चुकीच्या पद्धतीने वापरले जाणारे पेसिफायर बाळाच्या दातांसाठी अयोग्य आहे. ह्याचे परिणाम म्हणजे दात वाकडे वाढणे, हिरड्या सुजणे किंवा दात किडणे असे असू शकतात. हे सर्व खूप काळासाठी पेसिफायर वापरल्यास घडते. लक्षात ठेवा, जितक्या वेळ चुसनी बाळाच्या तोंडात राहील तितके त्यचे उच्चार बिघडतील

४) स्तनाग्रांची निवड 

संयुक्त राष्ट्रांच्या चिल्ड्रेन्स फंड या संस्थेच्या ‘स्टेप नाईन’ व तसेच जागतिक आरोग्य संस्थेच्या मते लहान बाळांना पेसिफायर देणे चुकीचे आहे कारण यामुळे बाळांचा स्तनाग्र निवडण्यात गोंधळ उडू शकतो. पेसिफायरचे स्तनाग्र चोखण्यात आणि मातेचे दुध पिण्यात फरक आहे. पेसिफायर ची सवय आईचे स्तनपान नियमित होण्या आधी लागल्यास बाळाचा कल बदलू शकतो.

५) मानसिक परीणाम 

चुसनीचा वापर खूप काळासाठी केल्यास बाळाच्या  मानसिक विकासावर परिणाम होऊ शकतो. यामागील  कारण असे आहे की बाळ पेसिफायर मुळे चेहेऱ्यावरील हावभाव दाखवण्यात कमी पडते. शिशूचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सुरवातीचे वर्षच महत्वाचे असतात तेंव्हा पेसिफायरचा अधिक वापर तुम्ही वेळीच थांबवा.

 

पेसिफायरची सवय न सुटणे.

तुमच्या शिशूची ही सवय सोडवणे अजून अवघड असते. बाळ रडू लागते किंवा हट्ट धरते. अचानक पेसिफायर वापरणे बंद करणेही कठीण होऊन बसते. अशावेळी हळू हळू त्याचा वापर कमी करून बंद करणे योग्य आहे.

१) पेसिफायरने  शांत करण्याऐवजी बाळाला जवळ घेऊन थोपटा. खात्री करा की दिवसा पेसिफायर चा उपयोग अजिबात होणार नाही.

२) बाळ लहान असेल ६ महिन्याचे तर त्याची सवय सोडवणे सोप्पे असते, तेच बाळ मोठे असल्यास त्याला यापासून परावृत्त करणे कठीण असते.

३)  बाळ तान्हे असताना पेसिफायर काढून घेणे आणि त्याबदल्यात त्याचे रडणे ऐकून घेण्यात तुमची झोप उडू शकते पण त्याच्या भल्यासाठी हे करणे आवश्यक आहे.

४) तेच थोड्या मोठ्या शिशूच्या बाबतीत तुम्हाला बराच संयम बाळगावा लागतो आणि तुमचे प्रयत्नही सतत चालू ठेवावे लागतात

५)  हे पेसिफायर तुमच्या बाळाकडून काढून घेतल्यानंतर त्याची होणारी नाराजी आणि चिडचिड यासाठी तुम्हाला तयार रहावेच लागेल. त्याचे आवडते काम त्याच्यापासून काढून        घेतले जाते त्यामुळे ह्याची प्रतिक्रिया ते देणारच.

६) तुमच्यासाठी पेसिफायर काहीही नसले तरी त्याच्यासाठी त्या वयात ते सर्वकाही आहे. त्यामुळे ही बाब समजून घ्या.

 ७) सर्वात चांगला मार्ग असं आहे की सुरवातीपासून बाळाला कधी पेसिफायर देऊच नका. आणि स्वत: सुद्धा हे त्याला देण्यापासून परावृत्त करा.

तुमच्या डॉक्टरांनी जसे सांगितले आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडे लक्ष दया. बाळाला जवळ घेऊन थोपटणे, त्याला गाणे म्हणणे, त्याचे लक्ष लागण्यासाठी त्याला खेळणे हातात देणे या मार्गांचा तुम्ही पर्याय म्हणून वापर करू शकता. तुमच्या लाडक्या बाळाची पुरेपूर काळजी घ्या आणि त्याला तुमचे लक्ष वेधून घेण्याची गरज पडणार नाही असे बघा. त्याला तुमचा जास्तीत जास्त वेळ देऊन त्याचे योग्य संगोपन करा. त्याच्या भविष्यासाठी ते महत्वाचे आहे.     

Leave a Reply

%d bloggers like this: