pudhil-7ghtakancha-aharatil-samavesh-tharel-lahan-mulansathi-buddivardhk

सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपली मुले टिकून राहावी या करता सुरवातीपासूनच त्यांचा आहार विहरात लक्ष ठेवणे गरजेचे आहे त्या नुसार त्याचा आहाराचे नियोजन असावे. लहान मुलांचा वयाच्या पाचव्या वर्षापर्यंतचा काळ स्मृतिसंपन्नतेसाठी व बुद्धीसंपन्नतेसाठी खूप महत्त्वाचा असतो. या कालावधीत मुलांची स्मरणशक्ती वाढावी यासाठी काय प्रयत्न करणे गरजेचे असते. पुढील ७ घटकांचा आहारातील समावेश लहान मुलांच्या बुद्धिवर्धनासाठी उपयुक्त ठरतील.

१) बदाम

 रात्री बदाम पाण्यात भिजत ठेऊन सकाळी बारीक करून मुलांना खायला दिल्यास मुलांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. बदामामध्ये फॉलिक ऑंसिडची मात्रा भरपूर प्रमाणात असल्याने त्याचा न्युरोलॉजिकाल सिस्टिमला फायदा होतो. तसेच तान्ह्या बाळाला भिजवलेला बदाम उगाळून गुटीच्या स्वरुपात देखील देतात

२) अक्रोड

अक्रोडमध्ये जास्त प्रमाणात जीवनसत्त्व-ई असते. अक्रोड काजु, पिस्ता या वर्गातील आहे. त्यामुळे त्याचे पोषणमूल्य जास्त प्रमाणात आहेत. तसेच अक्रोडमध्ये मुखेत्वेओमेगा -३ फॅटी अॅसिड यांचे स्त्रोत आहे जे मुलातील बुद्धीचा विकासाकरिता उपयुक्त असते तसेच अक्रोडच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढण्यास देखील मदत होते. ओमेगा -३ फॅटी अॅसिड हे विशेषत मास्यांमध्ये आढळते त्यामुळे मास्यांना शाकहारी पर्याय म्हणून लहान मुलांना अक्रोड देता येऊ शकतो.

३) गाईचे दुध

 लहान मुलाला साधारणता ६ महिन्यानंतर वरचे दुध देण्याचा सल्ला वैद्य देतात. त्यावेळी वैद्यकीय सल्ल्याने एक वर्षाच्या आतील मुलांना गाईचे दुध दयावे व इतर वयाच्या मुलांना  दुध देताना गाई चेच दुध दयावे गाई चे दुध हे लहान मुलांच्या मेंदूसाठी व ज्ञानेंद्रियांसाठी चांगले असते. या दुधात वैद्याच्या सल्ल्याने शतावरी कल्प, औषधे, सुकामेवा पूड घालून लहान मुलास पाजावे.

 
४) कोहळा

कोहळा हे फळ आहारशास्त्राबरोबरच आयुर्वेदिक शास्त्रातही तिच्या औषधी गुणधर्मामुळे महत्त्वाची फळ समजले जाते. मराठीमध्ये कोहळा तर संस्कृतमध्ये विदारी कुष्मांड या नावाने हे फळ ओळखले जाते. हे फळ गोल, लंबगोल आकाराचे असून त्याचा आतील गर हा मऊ व पांढराशुभ्र असते. बुद्धिवर्धनासाठी लहानमुलांच्या आहारात कोहळ्याचा वापर करावा. मज्जासंस्थेची कार्यशक्ती वाढविण्यासाठी कोहळ्याचा आहारात वापर करावा. कोहळा सूप किंवा रस पिल्याने मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो

५ ) पंचामृत

पंचमृताच्या सेवनामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती व एकग्रता वाढते पंचामृत कसे तयार करावे (२ चमचे तूप, १ चमचा मध, १ चमचा ताजे दही, १ चमचा साखर, ४-५ चमचे दूध यांचे मिश्रण)

 ६) हळद

हळदीच्या सेवनाने अल्जाइमर आणि डीमेंशियाचा या सारख्या मेंदूशी निगडीत आजारा पासूनमुलाचे रक्षण होते . हळद ही मेंदूमध्ये प्लेक बनवणा-या एक प्रकारचे प्रोटीन बनण्यापासुन थांबवते. हे प्लेक मेंदूला काम करण्यापासुन आणि स्मरणशक्ती नुकसान पोहोचवते. लहानमुलांना हळद दुधात घालून ते दुध पाजावे

 ७) अंडी

अंडी जशी लहान मुलांच्या शाररीक वाढीसाठी पोषक असतात तशीच मेंदूसाठी आवश्यक ठरततात आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

जसं वरील सात घटकाच्या आहारातील समावेश लहान मुलांसाठी बुद्धीवर्धक ठरतो तसेच आहारातील हिरव्या पालेभाज्याव त्यांचे सूप ,सुकामेवा, गुळ-खोबरे, फळे, फळांचा रस अश्या गोष्टीचा समावेश देखील लहान मुलांच्या बुद्धी वर्धनासाठी व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतता

Leave a Reply

%d bloggers like this: