ya-pach-karananmule-aaich-best-mom-aahe

 

ती’ ने तुमचे सारे विश्व् व्यापलेले असते. आईने तुम्हाला मोठं होताना पाहिले असते, ती’ तुम्हाला खाली पडताना पाहते, उचलते आणि पुन्हा उभे करून पुढे जायला सांगते. ती’ तुम्हाला मारते, रागावते, बोलते, आणि हे कधीच ती’ थांबवू शकत नाही. तशीच ती’ प्रेम करण्याचेही थांबवू शकत नाही. ती’ तुम्हाला प्रत्येक क्षणात घडवण्याचा प्रयत्न करते. कारण तिला आपली मुलगी किंवा मुलगा हा जगातल्या इतरांपेक्षा सक्षम होताना पाहायचा असतो. अशी आई प्रत्येकालाच मिळत असते. एका कथेत एका व्यक्तीने देवाला विचारले तू आहे की नाही. तेव्हा देवाने सांगितले मी आहे की नाही, यापेक्षा तुझी आई आहे ना. बस्स यातून आईबद्धल असलेला अर्थ प्रतीत होतो.   

१) आई एकाच वेळी अनेक कामे करते

ती’ सकाळी उठल्यापासून घरातली कामे, जॉब, नसेल तर नवऱ्याचा डबा, सासू-सासऱ्यांची देखभाल अशी सर्व कामे करून ती’ बाळाचंही बघते. कितीही कामे असली तरी कधीच बाळाचे सर्व लाड पुरवणे कमी करत नाही.

२) बरीच बाहेरची कामे तिच्याकडेच असतात

भाजीपाला, किराणा अशी कितीतरी कामे आईकडेच असतात. घरातल्या हिशोबाचे काम, दुधवाल्याला पैसे, पेपरवाला, धुणे भांडी करणारी बाई, ही सर्व कामे आईकडेच असतात. कधी जर किराणा, भाजीपाला नवऱ्याने आणला तर ती’ म्हणते ‘ इतके महाग आणले, भाजी खराब आणली, किराणा महाग दिला. शेवटी ती’ स्वतःच ही कामे करून घेते.

३) ती’ बाळाच्या बरोबर खेळण्यासाठी उपलब्ध असते

बाळाने त्याच्याबरोबर खेळायला सांगितले तर बाळाचे वडील सांगतील ‘अरे बाबा मी खूप थकलोय. किंवा मला काम करायचे पण आई कोणताच बहाणा न करता बाळाला खेळवते. जरी ती खूप दमली, थकली असेल. कारण बाळच तिचे विश्व् असते.

४) बाळामध्ये तिचा खूप जीव असतो

 Photo credits: http://thefw.com/16-reasons-why-moms-are-awesome/ 

हे चित्र खूप गोष्टी सांगून जाते. आई बाळासाठी कितीही त्रास घ्यायला तयार असते. मग ते रात्री उठणे असो किंवा स्वतःची झोप विसरणे असो.

५) ती सुपरहिरो आहे

ती इतके तुमच्यासाठी करत असेल तर ती सुपरहीरोचं आहे ना !

ही थोडीशीच कारणे आहेत.  आई ही सुपर स्पेशल आहे. तिच्या हृदयात तुमचे स्थान अढळ असते, त्याच्या जागेवर कोणीच येऊ शकत नाही. जर तुम्ही कुण्या आईचे मुलगी / मुलगा असणार तर तिला जाणीव करून द्या की, तुम्हीही तिच्यावर खूप प्रेम करता. तिच्या कष्टांना वाया जाऊ देणार नाहीत.  

Leave a Reply

%d bloggers like this: