stanagrachya-samasyavaril-5-upay

 

बाळाचे स्तनपान चालू असताना स्तनांविषयीच्या समस्या उद्भवणे सामान्य बाब आहे. स्त्रियांना स्तनपान काळात स्तनांतून रक्त येणे, सुजणे किंवा भेगा पडणे अशा प्रकारची लक्षणे दिसतात. याचे कारण बाळाची स्तनाग्र चोखण्याची पद्धत किंवा बाळाच्या तोंडात झालेले यीस्ट संक्रमण(इन्फेक्शन) देखील असू शकते.

जरी तुमचे स्तन गर्भावस्तेच्या तिसऱ्या त्रैमासिकातच तुमच्या स्तनांमध्ये दुधाचे विमोचन करत असली तरीही सामान्यपणे तुमची स्तनाग्रे बाळाच्या या चोखण्याला ओळखीची नसतात. त्याचमुळे स्तनपान करण्याची क्रिया अतिशय व्यवस्थित पद्धतीने घडली पाहिजे, खास करून तेंव्हा, जेंव्हा तुमची सुरवात असते.
स्तनांची सूज किंवा रक्त येणे, भेगा पडणे अशा प्रकारच्या समस्यांवर खाली ५ प्रकारचे उपाय दिले आहेत त्यांचा नक्की उपयोग करून बघा

१. बाळाला योग्यरीतीने पाजा.
तुमच्या बाळाला तुमच्या स्तनाग्रांचा दुध पिण्यासाठी योग्य पद्धतीने आणि सहज वापर करता येईल अशाप्रकारे तुमची व तुमच्या बाळाची पोझिशन ठेवा. बाळाला निट धरा जेणेकरून त्याला व्यवस्थित दुध पिता येईल. तुम्ही मांडीवर एखादी उशी ठेवून त्यावर बाळाचे डोके ठेवलेत तर तुम्हालाही पाजणे सहज होऊ शकेल. बाळाचे तोंड मोठे उघडून तुमची स्तनाग्रे पूर्णपणे त्याच्या तोंडात जातील असे बघा, म्हणजे त्याला दुध पिणे सोप्पे जाईल आणि तुमच्या स्तनांना काही त्रास होणार नाही.

२. तुमच्या दुधाचा वापर औषध म्हणून करा.
तुमच्या स्तनांमधील दुधात जीवाणूनाशके असतात. हे दुध काढून तुम्ही स्तनांवर लावलेत तर त्याचा फायदा होऊ शकतो. सूज आली असेल तर या दुधाने उपचार होऊ शकतात, असे केल्याने तुम्हाला बराच आराम मिळेल.

३. बाळाला जीभ हलवण्यास त्रास होत नाहीये याची खात्री करून घ्या.
अनेकदा काही बाळांना जीभ व्यवस्थित टाळूला ठेवण्यास समस्या येतात आणि त्यांना जीभ हलवता येत नाही. अशामुळे त्याने स्तनाग्र चोखताना तुम्हाला त्रास होतो. यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि गरज असेल तर उपचार सुद्धा करून घ्या.

४. ‘निप्पल शेल्स’ चा वापर करा.
स्तनाग्रंवर सूज आली असेल किंवा भेगा असून जखम झाली असेल तर त्यावर लावायचे आवरण बाजारात मिळते. हे निप्पल शेल्स स्तनाग्रावर लावल्यास कपडे घालताना किंवा काढतांना त्रास होत नाही किंवा  अंतर्वस्त्रांवर घर्षण होत नाही. त्रास टाळायचा असेल तर स्तनाग्रांना स्वच्छ आणि निरोगी ठेवणे गरजेचे आहे.  

५. तुमच्या बाळाला नियमितपणे स्तनपान करा.
बाळाला नियमितपणे पाजले न गेल्यास त्याला भूक लागली असेल तर ते जोराने चोखते. अशाने तुम्हाला अर्थातच त्रास होऊ शकतो. जसे बाळ मोठे होते तशी त्याची भूक वाढते, त्याच्या या बदलला समजून घ्या. बाळाला नियमित आणि वेळेवर दुध पाजल्यास तुम्हाला जास्त त्रास होणार नाही.
योग्य हेच राहील की तुम्हाला त्याच्या दुध पिण्यात जोर जाणवत असेल तर त्याला दर थोड्या थोड्या वेळाने पाजा, म्हणजे त्याची भूक स्थिर राहण्यास मदत होईल आणि तुम्हाला होणारा त्रास कमी होईल.
तुम्हाला वाटत असेल तर कधी कधी तुम्ही बाटलीने देखील बाळाला दुध पाजू शकता. तेवढाच तुमच्या स्तनांना आराम मिळेल आणि पूर्ववत होण्यास वेळाही मिळेल.

काळजी घ्या.!         .
     

Leave a Reply

%d bloggers like this: