तो खोटारडा नाही आणि त्याचा हेतू तुमच्या पासून गोष्टी लपवणे सुद्धा नाही. त्याने तुम्हाला खुश ठेवण्याची जबाबदारी घेतली आहे आणि त्यासाठी एखादे खोटे बोलला तर त्यात काय वाईट आहे? ह्या 9 प्रसंगी तुमचा जोडीदार तुमच्याशी खोटे बोलू शकतो.
१) या कपड्यात खूप छान दिसते आहेस.
तुमचा नवरा तुम्हाला आवडणाऱ्या कपड्यांवरून कधीच नाराज होणार नाही. आणि झालाच तरी तो तुमच्या भावनांचा आदर करतो. तुमच्या आवडीचा एखादा पोशाख तुमच्या शरीरयष्टीला शोभला नाही तरीही तो ते बोलून दाखवणार नाही.
२) मी १० मिनिटात निघतोय
तुमचा नवरा जोपर्यंत वक्तशिरपणाचं प्रतिक नाही, शक्य आहे की तो घरी परतायला त्याला हवा तेवढा वेळ घेईल. आणि कदाचित त्याला माहिती आहे की तुम्हाला, लागणाऱ्या वेळेचा एक पुसटसा अंदाज दिला तर तात्पुरता वेळ मारून नेता येईल. विलंब, लांबलेल्या कामकाजाचे तास आणि सभा, त्याला खोटं बोलायला प्रवृत्त करू शकते आणि एखादया खोट्याने काहीच फरक पडत नाही, किंवा असे त्याला वाटते.
३) मी सांभाळू शकतो.
तुम्ही मान्य केले पाहिजे की पुरुष अहंकारीच असतो. त्यांना वस्तुंचा ताबा घ्यायला व कठीण परिस्थिती हाताळायला आवडते. कुठलीही असो जसे की अधिक पैसे मागितल्याच्या कारणाने दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीशी भांडणे, किंवा अनावश्यक शुल्क लावणाऱ्या सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी वाद घालणे. पण कधीतरी मोठा गोंधळ होऊ शकतो.
४) तो माझा प्रश्न आहे
त्याला लहान मुलासारखे रडगाणे नाही गायचे आहे. तो अत्यंत नाराज असला की तो हे स्वसंरक्षण तंत्र म्हणून वापरतो.
५) पण मी कॉल केलेला
जेव्हा तुम्ही दोघे सिनेमा पाहण्याचा बेत आखता आणि तो तुम्हाला घायला येणार असतो तेव्हा हे होतच. ‘तुझा फोन नेहमी व्यस्त असतो, मी तुझी वाट पहात होतो,” तुमच्यावर दोष टाकण्याची ही एक पळवाट आहे. आणि आणि सगळ्या बेताचा बट्याबोळ करतो.
६) तुझी इच्छा नसेल तर नको
त्याचवेळी त्याची प्रबळ इच्छा असते. पण हे ही तितकच खरे की तो तिच्यावर कधीही बळजबरी करीत नाही व तिचे मन वळवण्याची वाट बघतो, मग अगदी मध्यरात्र ही असुदे.