pantylinercha-vapar-upayog-ani vapar

पँन्टी लायनर नाव बऱ्याच वेळा ऐकलेले असते. पँन्टी लायनर आणि पॅड मधला फरक काय? त्याचा वापर कश्यासाठी करतात असे प्रश्न  अनेक महिलांना हा प्रश्न अनेक वेळा पडला असेल. पँन्टी लायनर  म्हणजे काय आणि त्याचा उपयोग बघणार आहोत.  

पँन्टी लायनर म्हणजे काय 

हे पाळीच्या काळात वापरण्यात येणाऱ्या पॅड सारखेच असते. हे तयार करायला पॅड तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मटेरियल वापरण्यात येते. परंतु हे  पॅड पेक्षा पातळ आणि  थोडेसे लहान असते.  हे पाळीच्या वेळी ना वापरता श्वेतप्रदर किंवा लघवीवर ताबा नसणाऱ्यासाठी  व इतर योनी स्त्रावाचा याचा वापर करण्यात येतो. जर पाळीच्या वेळी तुमच्यकडे काहीच सोया नसेल तर तुम्ही याचा वापर करू शकता पण पॅड पेक्षा पातळ असल्याने जास्त वेळा बदलावे लागेल.  

किंमत

पँन्टी लायनरची किंमत ही पॅड्सच्या किंमती एवढीच असते उलट काही कंपन्यांचे पँन्टी लायनर  हे पॅडच्या किंमती पेक्षा कमी किंमतीचे असतात

पँन्टी लायनर कुठून खरेदी करावे

तुम्ही हे केमिस्टच्या दुकानातून किंवा सुपरमार्केट मधून जिकडे पॅड मिळतात त्या ठिकाणीहून खरेदी करू शकतात.

पँन्टी लायनर का वापरावे

महिलांच्या योनीमार्ग आणि त्याच्या आसपासच्या भागाचे आरोग्य आणि स्वछता राखण्यासाठी याचा वापर करावा. यामुळे त्या भागाच्या फंगल इन्फेक्शन होत नाही. मूत्रावर ताबा नसल्यास ओल्यामुळे  जांघेमध्ये खाज येण्याची शक्यता असते. पँन्टी लायनर मुळे  लघवी त्या शोषली जाऊन तो भाग कोरडा राहतो त्यामुळे खाज किंवा फंगल इन्फेक्शन होत नाही.

पँन्टी लायनरचा वापर कसा करावा

बऱ्याच प्रकारचे पँन्टी लायनर असतात त्यात साधारणतः पँन्टीसारखे घालायचे किंवा पॅड सारखे असतात. त्याच्या पाकिटावर दिलेल्या सुचनेनुसार त्याचा वापर करावा

Leave a Reply

%d bloggers like this: