streachmarkvar-ghrguti-upay

प्रसूतीनंतर येणारे स्ट्रेचमार्क्स घालवण्यासाठी अनेक स्त्रिया विविध उपाय करतात. त्यासाठी त्या विविध रासायनिक क्रिम्सचा वापर करतात. त्याचा काही महिलांना उपयोग होतो पण जास्तकरून त्याचे दुष्परिणामच  दिसून येतात. त्यासाठी काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. हे उपाय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि समजा याचा तुम्हाला उपयोग झाला नाही तर दुःपरिणाम तर होणार नाही.

१.कोरफड

कोरफड ही विविध त्वचेच्या आजारांवर उपयुक्त ठरते. कोरफडीचा गर दररोज स्ट्रेचमार्कवर नियमितपणे चोळावा. या मुळे  स्ट्रेचमार्क  कमी होण्यास मदत होते . त्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

२. विविध प्रकारचे तेलं

बरीच तेलं स्ट्रेच मार्क कमी करण्यास मदत करण्यास मदत करतात.  यामध्ये खोबरेल तेल, एरंडेल तेल स्ट्रेच कई तेल ऑलिव्ह ऑईल या तेलांचा समावेश होतो. काही मिनिटे यापैकी एका तेलाने स्ट्रेचमार्क असलेल्या ठिकाणी हलके मसाज करा. एरंडेल तेलचा मसाज  केल्यानंतर त्या भागाला हलकेच शेका.

३.कोको बटर

कोको बटर हे त्वचेसाठी नैर्सगिक मॉश्चरायझरचं काम करते. तसेच  स्ट्रेचमार्कचे डाग कमी करायला मदत करतं. महिनाभर याचा वापर स्ट्रेचमार्क कमी करण्यास मदत करतं 

४.लिंबाचा रस

लिबांचा रसामध्ये सायट्रिक ऍसिड असते. आणि  त्यामुळे शरीरावरील विविध डाग आणि मुरमांबरोबरच  स्ट्रेचमार्क कमी करण्यास मदत करते. लिंबाचा रस स्ट्रेचमार्क वर हलक्या हाताने २ मिनटे चोळा. नंतर कोमट पाण्याने धुवा. यामुळे स्ट्रेचमार्कचे व्रण पुसत होण्यास मदत होईल.

५.बटाट्याचा रस  

बटाट्यामुळे रस त्वचेच्या विविध समस्यांवर घरगुती उपाय म्हणून वापरण्यात  येतो.  तसेच स्ट्रेच मार्कसाठी देखील याचा उपयोग होतो. बटाट कापून त्याच एक तुकडा स्ट्रेचमार्कवर चोळा. असे दिवसातून एकदा महिनाभर केल्यास त्याचा फरक नक्कीच जाणवेल. 

Leave a Reply

%d bloggers like this: