balachya-taluchya-tvachevishyak-ajar-credel-cap

 

तुम्ही या प्रकाराबद्धल कधीही ऐकले नसेल तर सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे तुमच्या बाळांच्या केसात होणार कोंडा होय. महत्वाची गोष्ट म्हणजे. टाळूवरील क्रेडल कॅप हा संसर्गजन्य आजार नाही. आणि सहजपणे पूर्ण बरा देखील होऊ शकतो.  इनफंटाईल सेब्रेहिक डर्मटायटिस अशी यांची वैज्ञानिक संज्ञा आहे. साधरणतः बाळाच्या जन्मानंतर काही आठवड्यात क्रेडल कॅप बाळाला होऊ शकतो. आणि हे बरे होण्यास ३ ते ४ महिने लागतात.  

क्रेडल कॅपची  कारणे

नवजात शिशूमधील अत्यंत खाज सुटणाऱ्या ईक्झिमा आणि क्रेडल कॅप  यांत बराच फरक आहे. गोंधळून जाऊ नका. डॉक्टरांच्या मते आईकडून बाळाला मिळणाऱ्या संप्रेरकांचा हा परिणाम असू शकतो. ही संप्रेरक अतिरिक्त प्रमाणात तेल स्रवण्यास कारणीभूत ठरतात. त्याच बरोबर विशिष्ट प्रकारच्या इस्ट संसर्गामुळे तेल ग्रंथी मधून होणाऱ्या जिवाणूयुक्त दूषित स्त्राव याचे आणखी एक कारण असू शकते.

क्रेडल कॅप ची लक्षणे

१) टाळूवरील त्वचेचे पापुद्रे निघणे

२)  टाळूच्या त्वचेवरील हलकासा लालसरपणा

३) डोक्याचा त्वचेवर पट्टे, खवले किंवा जाडसर कण येणे

४) पिवळे किंवा पांढरे पापुद्रे निघत असलेली तेलकट किंवा कोरडी त्वचा

घरगुती उपाय 

१) तेलकट असणाऱ्या टाळूच्या त्वचेवर कुठेही तेल वापरल्याने नक्कीच त्रासात भर टाकणारे वाटू शकते. पण अनेक पालकांना या साध्याशा उपायावर विश्वास वाटत आलेला आहे. तुमच्या बाळाच्या टाळूच्या त्वचेवर थोडे, आलिव्ह ऑइल, थोड्या सौम्य प्रमाणात चोळा. अगदीच सहजतेणे वापरता येणारा उपाय म्हणून तुम्ही घरगुती खोबरेल तेल वापरू शकता.

 २) तुमच्या बाळाचे केस नियमितपणे अगदी सौम्य शाम्पूने धुवा. तीव्र, किंवा शाम्पूचा अतिवापर बाळाच्या त्वचेसाठी हानिकारक असतो. अंघोळीनंतर टाळूच्या त्वचेवरील पापुद्रे सैल होतील तेव्हा हलक्या हाताने किंवा बाळांच्या मऊसर कंगव्याच्या साहाय्याने काढून टाका. शक्यतो या पापुद्रे आणि खवल्याने ओढून काढणे टाळा. यामुळे त्वचेवर चट्टे पडून संसर्ग होऊ शकतो. जर टाळूवरील पापुद्रे निघण्याचा हा त्रास लवकर बारा झाला नाही तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ला घेणे उत्तम.

 

Leave a Reply

%d bloggers like this: