balala-sodun-kamavar-jatana-swthla-dosh-deu-naka

 

तुम्ही एका बाळाला काही दिवसांपूर्वी जन्म दिलाय. तुमच्या घरात आनंदोत्सव सुरु आहे. तुमच्या आयुष्यात खूप आनंदायक क्षण आलेत. पण त्याचबरोबर या आनंदाच्या क्षणासाठी तितका त्यागही करताय. रात्रभर जागून राहणे, अंगावरचे दूध येण्यासाठी दररोज एकच आहार घ्यायचा, नेहमी थकवा आणि तोच थकवा आणणारा नित्यक्रम सुरुवातीला तर खूपच कठीण जात होते पण आता सराव झाल्याने जमवून घेतात. दररोज खूप कष्ट करून थकल्यानंतर रात्री शांतपणे झोपता, तोच बाळाचा रडण्याचा आवाज. शेवटी बाळाला दूध पाजवतानाच झोप लागते. व कुठेतरी वाटते बाळाचे पालन पोषण करणे म्हणजे दिव्यच आहे.

 सकाळी झोपेतून उठल्यावर बाळाचा चेहरा पाहताक्षणी वाटते की, या माझ्या जिवाच्या तुकड्यासाठी कितीही कष्ट घ्यायला तयार आहे. आणि आनंदाने दिवसाची सुरुवात करता.  मग बाळ हसते, खेळायला लागते, गोधडीवर इकडून तिकडे फिरायला लागते. आणि काही दिवसांनी बाळाच्या गोंडस चेहऱ्यावर पाहताना जाणीव होते. आणि बाळ आता थोडे मोठे झालेय, तेव्हा याला सोडून मी नोकरी, जॉब कशी करणार ? तुमचा जीव बाळामध्ये खूप अडकणार. तुम्ही स्वतःला दोष देणार की, बाळ महत्वाचे की नोकरी. या क्षणात बाळाजवळ मी थांबायला हवे. जर त्याला सोडून गेले तर ?

असे कितीतरी प्रश्न तुम्हाला पुन्हा जॉब सुरू करण्यावेळी पडतात. पुन्हा जॉबला रुजू व्ह्यायची तुमची इच्छा नसतेच. पण नाईलाज असतो तेव्हा तुम्हाला गिल्ट वाटत असते. पण लक्षात घ्या तुम्ही मुलाच्या भविष्यासाठीच करताय म्हटल्यावर असा विचार सोडून पुन्हा जॉब सुरु करा. आता बरेच पर्याय आहेत. आणि असेही तुमचे सासू – सासरे असतातच. व नवराही तुमच्या मदतीला आहेच. आणि जॉब संपल्यावर तर बाळ आहेच.

  १) आई वडिलांना बोलावून घ्या

जर तुम्ही व तुमचे पती जॉब साठी बाहेर गावी आला असाल. मग बाळासाठी आई-वडिलांना बोलावून घ्या. ते सोबत असतातच. पण वाटल्यास जॉब सुरु केल्यानंतर त्यांना जास्त दिवस थांबायला लावा. आणि तेही थांबतील. यावेळी उगाच अतिआत्मविश्वास स्वतःबद्धल ठेऊ नका. काही  कौटुंबिक समस्या असतील तरी बाळासाठी सर्व विसरून आनंदाने साऱ्या गोष्टी समजून घ्या. आणि तसे काहीच जमत नसेल तर बाळाचा सांभाळ करणाऱ्या दाई कडे बाळाला द्या.  

२)  काळजी वाटते बाळ कसा राहील

तुम्ही जॉब गेल्यावर चिंता वाटेल बाळ काय करत असेल. त्याने जेवन केले असेल का? पण खरं म्हणजे तुमचा बाळ त्या ठिकाणी जास्त स्वतंत्र  होईल. व त्याला कुणावरही अवलंबून राहायची सवय लागणार नाही. त्या ठिकाणी तो तुमच्याशिवाय जग बघेल आणि अनुभव करेल.

३) दाईकडे

जर तुमचा मुलगा दाई कडे किंवा day care ला असेल तर त्याला अचूक वेळेवर खाणे, खेळणे, शिकणे व झोपणे याची सवय लागेल. आणि इतर मुलांमध्ये राहिल्यावर तो स्वतःच निर्णय घ्यायला शिकेन. अप्रत्यक्षपणे त्याचा मानसिक व शारीरिक विकास घडून येईल. आणि तुम्हाला वाटेन की या ठिकाणी बाळ आनंदी आहे.  असेही तुम्हाला लक्षात येईल.

४) आई पासून दूर

बाळ जेव्हा आईपासून थोडा कालावधी करता दूर होते. तेव्हा ते जास्त स्वत्रंत बनते. आणि तो मुलगा जसा मोठा होतो तसा कोणत्याही परिस्थितीला सामोरा जातो. कारण बरेच आई वडील अतिकाळजी घेतात. त्यामुळे बाळ पूर्णपणे अवलंबून होऊन भित्रा होते.

५) मित्र परिवार

बाळाचे मित्र होतात. जरी ते लहान असले तरी मित्र होतात. एकमेकांच्या भावना त्यांना आईपेक्षा चांगल्या समजून येतात. त्यामुळे त्यांची मैत्री जमून येते. आणि यामुळे तुम्हालाही हलके वाटते की, बाळ कुठेतरी रमायला लागला.

 

Leave a Reply

%d bloggers like this: