balasathi-aajibaicha-batava-aani-gharguti-aushdh

 

आताच्या अत्याधुनिक पिढीसाठी आजीबाईच्या बटव्याची ओळख करून देत आहोत. आजीबाईचा बटवा आणि बाळगुटी या दोन्हींना आयुर्वेदाचा पाया आहे. कफ- वात- पित्त या त्रिदोषांचा संपूर्ण विचारही आहे. आता  जशी पिढी अत्याधुनिक होतेय तशी जुन्या गोष्टींना विसरत जातेय. पण ज्या गोष्टी या शाश्वत व उपयोगी असतात. त्या तर कधी विसरू नये. व बऱ्याच पालकांचे म्हणणे  असते की, आम्हाला आता आजीबाईचा बटवा व जुने घरगुती उपचार यांच्याविषयी काहीच माहिती नाही. आणि त्यासाठी काही माहितीचा स्रोतही नाही. तेव्हा आम्ही आजीबाईच्या बटव्याविषयी सांगतोय.

     कडू औषध

आपण लहान मुलांना गोड अन्न जास्त प्रमाणात खाऊ घालतो. आणि त्यामुळे काही साधे विकारही बाळाला होतात. यात सर्दी, अपचन, त्वचारोग. काही पालक याच्यावर उपाय म्हणून आजीबाईच्या बटव्यातील कडू व तुरट पदार्थ देतात. आणि तेच पदार्थ औषधी म्हणून उपयोगाचे ठरतात.

१) जायफळ

हे औषध खूप महत्वाचे आहे. आणि ह्या औषधाला जुलाबावर प्राथमिक औषध म्हटले जाते. आजही खेड्यात बाळाला जर जुलाबाच्या त्रास होत असेल तर जायफळ देते. या बाबत एक दक्षता घ्यावी की, जर बाळाला जंतुसंसर्गामुळे जुलाब होत असतील तर जायफळाच्या जादा मात्रेने थांबविण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्यामुळे आतडयांचे चलनवलन कमी होऊन पोट फुगू शकते. मलावरोध व रोज शी न होणाऱ्या बाळाला जायफळ द्यायचे नाही.  

२) कुटकी

कुटकीची मूळ  ही आजकाल  अनेक यकृतावरील औषधात वापरली जातात. कावीळ, भूक न लागणे,  मलावरोध  पचनाच्या तक्रारी यावर उपयुक्त पण ही सुद्धा कडू व जुलाब घडवणारी म्हणून जरा  जपणूच.

४) अनंतमूळ(सारिवा)

या औषधीच्या काड्या त्रिदोषनाशक म्हणून आयुर्वेदात जाणल्या जातात. रक्तविकार, त्वचेवरील खरूज, खाज यांचा नायनाट करण्यासाठी उपयुक्त.

५) नागरमोथा

या लव्हाळ्याच्या मुळांच्या गाठी तापावर, अतिसारावर, वापरतात. उष्णतेच्या विकारांवरही उपयोगी. पण जास्त प्रमाणात वापरल्यास मलावरोध वजन न वाढणे असले त्रास होऊ शकतात.

६) काडेचिराईत

या कडू कॉफीच्या रंगाच्या काड्या पचन सुधारण्यासाठी, जंतनाशक, व ताप कमी करण्यासाठी वापरतात. तापावरील आयुर्वेदिक औषदामध्ये  हे असतेच.

७) हळद

रोजच्या वापरातील हळद बहुपयोगी आहे. सर्दीवर हळद गुळाची गोळी सर्व परिचित आहे. पण हळदीने  मलावरोध होतो. म्हणून ती तेल / तुप दुधाबरोबर द्यावी.

८) वेखंडाचे खोड

हे सुंगधी परंतु अतिकडू औषध पोटातले जंत कमी करते. सर्दीवरती उपयुक्त आणि बुद्धिवर्धक आहे. पण जर थोडे जास्त गेले तर उलट्या होऊ शकतात. ज्या बाळांना पित्ताचा तरस असेल तर त्यांना वेखंड टाळावे.

९) गुळवेल

नावात गुळ आहे पण हे कडू औषध आहे. याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. तापावरही उपयुक्त आहे.

ही कडू औषधे आहेत तशीच तुरट व तिखट औषधेही आजीबाईच्या बटव्यात आहेत. बाळाला जर अलोपॅथिक औषधींची ऍलर्जी असेल तर तुम्ही आजीबाईचा बटवा वापरू शकतात. 

Leave a Reply

%d bloggers like this: