garodar-astana-mulachya-vikasasathi-aaine-konty-goshicha-vichar-karava

 

रोदरपणात आईच्या विचारांचा तिच्या गर्भावर मुलावर परिणाम होत असतो. कारण आई जे विचार करते त्याचा परिणाम   थेट  गर्भावर म्हणजे मुलावर होतो आणि याला इतिहास पण साक्षी आहे. नकरात्मक विचारांचा बाळावर  वाईट परिणाम होतो. गर्भारपणात आई तणावात असेल तर त्याचा थेट परिणाम भविष्यात मुलाच्या वागण्यावर दिसून येतो. मुल खुप  चीड चीड करतं. सतत रडत असतं . ज्यावेळी तुम्ही आई खुश असते त्यावेळी बाळावर  चांगले परिणाम होता त्यांचा रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होतो. त्यामुळे आईने कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे हे आपण पाहणं आहोत.

१. सकारात्मक  विचार करावा.

 सर्वप्रथम स्त्री गरोदर होते त्यावेळी तिने नकारात्मक आणि त्रासदायक विचार करू नये. सकारात्मक आणि  चांगल्या आनंदायक विचार करावे.

२. मुलाच्या सुदृढ वाढीबद्दल विचार

या काळात बाळाच्या सुदृढ वाढीबद्दल विचार करावा. कितवा महिना चालू असेना, गर्भ किती महिन्याचा का असेना. तुम्ही त्याच्या सुदृढ वाढीचा विचार करा. नकारात्मक विचार करू नका. त्यामुळे मुल सुदृढ जन्माला येते. 

३. तुमचं बाळ कसं दिसेल

बाळ  जन्माला आल्यावर कोणासारखं दिसेल याचा विचार करा. तुमच्यासारखं की त्याच्या बाबासारखं, तुम्हला ते कोणासारखं हवं त्याचा विचार करा. तसेच  त्याचे व्यक्तिमत्व कसं असावं याचा विचार करा.

४. मुल सतत आनंदी असेल असा विचार करा.

तुमचं बाळ नेहमी हसरं खुश,आनंदी असेल असा विचार करा. ते तुमच्याशी गप्पा मारत आहे आणि हसत आहे. असा विचार करा त्यामुळे तुमचं मुल भविष्यात खरचं  आनंदी आणि हसरं होईल.

५. मुलाच्या बौद्धिक आणि मानसिक विकासाबाबत विचार करा.

बाळाचा बौद्धिक विकास योग्य पद्धतीने होत आहे. त्याच्या मेंदूचा प्रत्येक भागाचा विकास व्यवस्थित होत आहे. त्याची आकलन शक्ती देखील योग्य दिशेने विकसित होत आहे. त्याचात संवेदनशीलता असेल असा विचार करा. यामुळे बाळाचा बौद्धिक आणि मानसिक विकासात सकारात्मक फरक पडतो.

गरोदर असताना तुमच्या आयुष्यात कितीही ताण असेल कितीही समस्या असतील तरी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आणि योग्य वाढीसाठी आनंदी  राहायचा प्रयत्न करा. दिवसातून थोडा वेळ काढून सकारत्मक आनंदी  विचार करा. त्यामुळे तुमच्या बाळाचे आयुष्य आनंदी  आणि सुखकर होईल.

Leave a Reply

%d bloggers like this: