garodarpanat-hya-goshti-dhokedayk-aahet

 

न्यूयार्कचे प्रसिध्द डॉक्टर ‘पीटर बार्नस्टाईन’ यांचे म्हणणे आहे की, जर तुम्हाला खूप रक्तस्त्राव, पोट दुखणे आणि पहिल्या त्रैमासिकात जर बेशुद्ध झाल्यासारखे वाटत असेल तर ही ‘एक्टॉपिक प्रसुतीचे लक्षण असू शकतात. एक्टॉपिक प्रसूतीमध्ये स्त्रीचे गर्भ गर्भाशयात वाढण्याऐवजी दुसरीकडेच वाढायला लागते. आणि त्यामुळे गर्भवती स्त्रीच्या जीवाला धोका असतो. पहिल्या व दुसऱ्या त्रैमासिकात जर खूप रक्तस्त्राव होत असेल तर गर्भ पडू शकतो. त्याच ठिकाणी जर तिसऱ्या त्रैमासिकात होणारा  रक्तस्त्राव गर्भवेष्टन फाटण्याचे संकेत असतात. पण हे केव्हा होते, गर्भवेष्टन पासून गर्भाशय तुटून वेगळे होऊन तुटून जाते तेव्हा. त्यामुळे रक्तस्त्रावला हलक्या पद्धतीने घेऊ नका. लगेच डॉक्टरांकडे जाऊन या.

१) खूप उलट्या आणि चक्कर

थोड्याफार प्रमाणात चक्कर व उलटी गरोदर स्त्रीला होत असतेच. पण ज्यावेळी तुम्ही काही खात नाहीत, पीतही नाहीत आणि लगोलग उलट्या व चक्कर येत असतील तर तुम्हाला इशारा आहे. आणि त्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. या स्थितीमुळे आपले मूल कुपोषित होऊ शकते.

२) गर्भात वाढणाऱ्या बाळाची काहीच हालचाल होत नसेल 

गर्भात वाढणारे बाळ लात किंवा पाय मारत असते आणि त्याच्या संवेदना आईलाही जाणवत असतात. पण अचानकपणे बाळ काही तासांसाठी किंवा दिवसांसाठी काहीच हालचाल करत नसेल तर डॉक्टरांना दाखवा. कारण बाळाला काहीतरी विकार होऊ शकतो. हे तपासण्यासाठी थंड किंवा गरम काहीतरी पिऊन झोपून घ्या. आणि जाणीव करण्याचा प्रयत्न करा की, बाळ हालचाल करतोय की नाही. दुसरा पर्याय : तुम्ही बाळाच्या पाय मारण्याची संख्या मोजा. जर त्याने २ तासात १० पेक्षा कमी वेळा पाय मारलेत. तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.

३) तिसऱ्या त्रैमासिकात प्रसूतीच्या अगोदर वेदना

गर्भावस्था ही नैसर्गिकपणे ९ महिन्याची असते. त्यामुळे पहिल्यांदा आई होणाऱ्या मातांना नैसर्गिक प्रसूतीच्या वेदना आणि  मुदतपूर्व  होणाऱ्या वेदनांमध्ये फरक समजून येत नाही. मुदतपूर्व कळा या अनियमित किंवा स्थिर वेगाने  होत असतात. याच्यात कळा या जशाच्या तश्या राहतात. आणि या कळा एका तासात किंवा पाणी पिल्यानंतर बंद होतात. नैसर्गिक प्रसूतीच्या वेदना: या कळा १० मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेत येतात. या कळात खूप तीव्रता नसते.  आणि जर तुम्हाला डिलिव्हरीच्या तारखेवर शंका असेल तर डॉक्टरांना भेट द्या.

४) शरीराला घाम येणे

गरोदरपणाच्या वेळी गर्भ तरल पदार्थापासून बनलेला असतो. त्याला एमनीऑटिक सैक म्हणतात. प्रसूतीच्या वेळी हा तुटून जातो. आणि घाम येणे म्हणतात. याच्यामुळे बाळाला बाहेर येण्याची मदत होते. पण जर डॉक्टरांनी सांगितलेल्या तारीखेपेक्षा अगोदर घाम यायला लागला तर बाळाचा जन्म अकाली होण्याचे धोके वाढतात.

५) तिसऱ्या त्रैमासिकात  वारंवार पोटदुखी, चक्कर आणि डोखं दुखणे आणि डोळ्याला अंधारी येणे

वैज्ञानिक शब्दात याला pre- eclampsia ची लक्षणे मानली जातात. ही गरोदरपणात होणारा  खूप भयानक आजार म्हटला जातो. यामुळे गरोदर स्त्रीचा मृत्यूही होऊ शकतो. याची दुसरी लक्षणे आहेत उच्च रक्तदाब आणि मूत्रमध्ये खूप प्रमाणात प्रोटीनची मात्रा. आणि याची सुरुवात गरोदरपणाच्या २० आठवड्यापासून होते. तेव्हा असा त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा. घाबरण्याचे कारण नाही तुम्ही चेकअप करत असतात.

६) फ्लू आणि खोकला आणि ताप

डॉक्टर सांगतात की, गरोदर मातांमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना ताप, खोकला, सर्दी लगेच होते. आणि काही संसर्गही लवकर होतो. स्वाईन फ्लू सुद्धा लवकर होण्याची शक्यता गरोदर मातेत जास्त असते. त्यामुळे गरोदर मातेने लसी घेणे आवश्यक आहे. वेळेवर लस घ्यायची. आम्ही आशा करतो की, तुम्ही डॉक्टरांकडून सर्व शंकांचे निरसन करून  घेत असाल. नाहीतर त्यांना विचारत रहा.

 

Leave a Reply

%d bloggers like this: