mulana-shikva-kahi-changlya-savayi

लहान मुलांना काही सामान्य सवयी लावणे गरजेचे असते. या सवयी मुलाच्या आरोग्यासाठी चांगल्या असतातच तसेच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी देखील उपयुक्त असतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा की तुम्ही जे करता त्याचे अनुकरण तुमची मुलं  करत असतात. त्यामुळे तुमचे वागणे आणि सवयी देखील योग्य ठेवा. त्यामुळे तुमचं मुल तुमच्या चांगल्या सवयीचं अनुकरण करेल .

१. सकस आणि पौष्टिक आहार

पौष्टिक आणि घरचे खाणे हि एक सवय मुलांना लहान वयात लागलेली चांगली असते. त्याच्या वाढीच्या वयात सकस पौष्टिक आणि घराचा ताजे जेवण जेवायची सवय मुलांना लावणे गरजेचे असते. त्यासाठी मुलासमोर सतत बाहेरचे पदार्थ जंक फूड फास्ट फूड खाऊ नये आणि त्यांना देऊ नये. त्यांना पौष्टिक आणि सकस आहाराचे महत्व पटवून द्यावे.

२. शाररिक स्वच्छता

तुमच्या मुलाला शारीरिक स्वच्छतेबाबत माहिती समजवून सांगा.दिवसातून दोनदा दात घासायला सांग. सकाळी    उठल्यावर आणि एकदा झोपण्यापूर्वी. तसेच जेवण झाल्यावर चूळ भरणे, बाहेरून आल्यावर हात-पाय धुवायला सांगणे. स्वतःची आंघॊळ  स्वतः करणाऱ्या मुलांना रोज अंघोळीच्या वेळी सर्व अंगाला साबण लावून स्वच्छ अंघोळ करणे. सगळे अंग व्यवस्थित कोरडे करणे यामुळे मुलांना स्वच्छतेची सवय लागेल आणि आजारी पाडण्याचे प्रमाण कमी होईल

३. बाहेर खेळायला जाणे.

तुमच्या मुलाला घरात बसून टीव्ही, कॉम्पुटर, मोबाईल फोन  यांच्यात अडकवून ठेवण्या पेक्षा त्यांना बाहेर आणि मैदानी खेळ खेळायला प्रोहत्सान द्या. त्यामुळे मुलाचा व्यायाम होईल तसेच बाहेरच्या वातावरणचा आनंद घेऊ शकेल. ४ मुलामध्ये मिसळल्यावर कसे चारचौघात कसे वागायचे बोलायचे हे कळेल. तुमच्य

४. निसर्गाची ओळख

तुमच्या मुलाला टीव्ही मोबाईल, कॉम्युटर गेम या आभासी जगात न अडकवत त्यांना निसर्गाची ओळख करून द्या . त्यांना विविध ठिकाणी फिरायला घेऊन जा. झाडे पाने फुले, पाणी पक्षी यांची ओळख करून द्या. तार्यांविषयी माहिती द्या. त्याच्यात निसर्गाविषयी ओढ आणि कुतूहल निर्माण करा.

५. स्वच्छता

रस्तावर, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कचरा टाकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा. या सवयीमुळे तुमचे मुल भविष्यात उत्तम नागरिक बनेल

Leave a Reply

%d bloggers like this: