आपली बाळाच्या बाबतीत एकच अपेक्षा असते. बाळाचे पोषण व्यवस्थित व सुरक्षित व्हायला पाहिजे. पण त्याची वाढ ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने होत नाहीये. तेव्हा तुमची चिंता वाढते. पण चिंता करण्याची काही गरज नाही. बाळाचे वजन चौदा दिवसानंतर वाढते. तीन – चार महिन्यात त्यांचे वजन दुप्पट आणि एका वर्षानंतर त्यांचे वजन तिप्पट होते. परंतु तुमच्या बाळाचे वजन कमीच आहे आणि ते याप्रमाणे वाढत नाहीये. तेव्हा या ठिकाणी काही पदार्थ सांगतोय ती अन्नपदार्थ बाळाचे वजन वाढायला मदत करतील. ( हा आहार २ वर्षाच्या पुढच्या बाळाला द्यावा किंवा काही शंका असल्यास डॉक्टरांशी बोलून घ्या.)
१) फळे
फळे ही नैसर्गिक असल्याने त्यांचा साईड इफेक्ट होत नाही. आणि जर तुमचे बाळ फळ खात नसेल तर त्याला ज्यूस प्यायला द्या. फळांमध्ये कॅलरीज भरपूर असतात.
२) नाचणी
यांच्यात खूप पौष्टिक गुण आहेत. जसे की, कॅल्शिअम, लोह, व्हिटॅमिन, प्रोटीन, आणि मिनरल्स सुद्धा यात असतात. नाचणी पचायला हलकी आहे.
३) बटाटा
बटाटामध्ये खूप कार्बोहाड्रेट असते. आणि यांच्यात मिनरल्स आणि व्हिटॅमिन सुद्धा असते. आणि जर तुमचा थोडा मुलगा मोठा असेल त्याला बटाटा शिजवून देऊ शकता. फ्रेंच फ्राईज आणि हॅश ब्राऊन सुद्धा खायला देऊ शकता.
४) दूध
दुधाबाबत तर तुम्हाला माहिती आहेच. जर मुलाला क्रीम दूध दिलेच तर त्याची चवही लागेल आणि वजन वाढायला मदतही होईल. वाटल्यास काही पदार्थात दूध मिसळून देऊ शकता.
५) केळी
केळीमधून खूप ऊर्जा मिळते. एका केळीत १००+ कॅलरीज असतात आणि कार्बोहायड्रेट, पोटेशियम, व्हिटॅमिन, यांची मात्रा खूप असते. केळी खायला व पचायलाही हलकी आहे. केळीचे काप करून कुस्कुरून देऊ शकता.
जर तुम्ही बाळाला मांसाहारी खाणे देत असाल किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही अंडे किंवा चिकनही देऊ शकता. पण अगोदर मुलाला काही ऍलर्जी नाही आहे ना ? त्या विषयी खात्री करून घ्या.
६) अंडे
अंड्यात व्हिटॅमिन ए आणि बी -१२ असतात. अंडे शरीराच्या नर्व्हस सिस्टम आणि बुद्धीच्या विकासाला मदत करतो. अगोदर बाळाला अंड्याच्या बाहेरचा पदार्थ खाऊ घाला. मग नंतर अंड्यातील पिवळा बलक. आणि जर बाळाला अंडे पचत नसेल किंवा ऍलर्जी असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवा.
७) चिकन
जर तुमची मुलाला मांसाहार द्यायची इच्छा असेल. तर मांसाहार वजन वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. चिकनमध्ये एमिनो ऍसिड, प्रोटीन, लोह, झिंक, आणि सेलेनियम असते. वजन वाढण्याबरोबर बाळाचे स्नायूही मजबूत होतात. पण चिकन खाऊ घालताना त्याला पंचतंय का नाही. हे पण बघा.