balachya-janmanaatar-ya-sat-margaani-prem-vyakt-kra

 

 तुमच्या घरात आनंदाचे गाठोडे आलेय ना! बाळ घरात आल्यावर सर्व धावपळ, गडबड, आणि गोंधळ सुरु होतो. त्यातच दिवस जातात. बाळाच्या आईला व वडिलांनाही कळत नाही की, दिवस किती लवकर जातात. बाळाच्या अगोदर तुमचे दिवस किती शांत असायचे. पण आता नुसता गोंधळ. बाळाचा जन्म झाला म्हटल्यावर त्याच्यासाठी पॅरेंटिंगची पुस्तके, बेस्ट प्ले स्कुल कुठे मिळेल, असा शोधही सुरु होतो. बाळ आनंद घेऊन येते तशी जबाबदारीही घेऊन येते. काही जोडीदार बाळाच्या जन्मानंतर खूप जवळ येऊन त्यांचे प्रेम गाढ होते. आणि बाळाच्या सर्व गोष्टी करण्यात एकत्रितपणे वेळ मिळाला नव्हता. तेव्हा

१) रात्री जेवायला बाहेर जा

बाळाची आई गरोदरपणा, प्रसूती, प्रसूतीनंतर बाळाची देखभाल या सर्व गोष्टींनी ती थकलेली व कंटाळून गेली असते. आणि घरात बाहेर सर्व ठिकाणी बाळाच्याच गोष्टी चालू असल्याने तुम्हाला काहीतरी बदल हवा असेल तर मस्त छानपैकी रात्री दोघांनी एकत्र जेवायला बाहेर जा. आता प्रसूतीनंतर जी पदार्थ तुम्हाला डॉक्टरांनी सांगितली असतील तीच घ्या. छान नाईट डिनर घेत असाल तर बाळाच्या गप्पा सोडून तुमच्या इतर गप्पा करा. म्हणजे थोडा बदल वाटेल. चित्रपटाविषयी किंवा तुम्हाला आवडणाऱ्या विषयावर बोला. यामुळे तुमचा थकवा जाईल. आणि बाळाच्या पोषणासाठी नवीन ऊर्जा मिळेल.

२) डेट नाईट इन हाऊस (date night in room)

जर काही कारणास्तव तुम्हाला बाहेर पडता येत नसेल तर घरीच बाळ झोपल्यावर छानपैकी मंद संगीत लावून घ्या. छोटासा टेबल घेऊन त्याला सजवून, त्यावर प्लेट ठेऊन, खुर्ची टाकून बसा. आणि आपण घरीच बसलो आहोत विसरून गप्पा करा. घाबरू नका, बाळ यावेळी रडणार नाही कारण त्याला माहिती आहे की, मम्मी- पप्पाला आज आराम द्यायचा.

३) सरप्राईझ करा

एखाद्या दिवशी तुम्ही पतीच्या आवडीची भाजी करा. किंवा पतीला आवडणारी गोष्ट करून सरप्राईझ द्या. तीच गोष्ट पतीने पत्नीच्या बाबतीत करावी.

४) टीम वर्कने काम करा

घराची कामे असोत किंवा ऑफिसची दोघांनी एकमेकांना मदत करून कामे करायची. बाळाच्या बाबतीत तर अनिवार्यपणे एकत्रित कार्य करावीत. जसे की, मम्मीने बाळाला वरती उचलून धरावे आणि वडिलांनी बाळाचे डायपर बदलावे. अशीच एकत्रित काम केल्यावर प्रेमही वाढेल.

५)  एकमेकांना गिफ्टिंग करा

जर व्हॅलेंटाईन किंवा वाढदिवस असेल तर एकमेकांना गिफ्ट देऊन तुम्ही किती स्पेशल आहात हे दोघांना कळेल. तेव्हा नियोजन करून घ्या की, जोडीदाराला काय भेट देता येईल.

 ६) प्रशंसा करत रहा

एका बाळाची आई म्हणून त्या स्त्रीने खूप मोठा त्याग केला असतो. तेव्हा तिच्याबाबत नेहमी तिला सांगत रहा. की, तू खूप कष्ट उपसते’ कारण तिलाही बरे वाटेल.

७) ज्यांना बाळ आहे त्यांच्यासोबत सहलीला जा

ज्या कुटुंबाला तुमच्यासारखे बाळ असेल त्यांना सोबत घेतल्यावर एकटेपणा जाणवत नाही. कारण तुम्ही एकमेकांची दुःख व सुख समस्या, त्रास, काळजी, चिंता सर्वच शेअर करतात. म्हणून तुम्हाला हलके वाटते. आणि २०१४ मध्ये wayne विद्यापीठाच्या अहवालात नमूद केले आहे की, दोन बाळ असलेली कुटुंबे एकत्र फिरायला गेल्यावर खूप आरामशीर फील करतात.  

 

Leave a Reply

%d bloggers like this: