lahan-mul-gharat-astanchi-swachta

 

     स्वछता ही सगळ्यांच्या आरोग्यकरता आवश्यक असते . नुकत्याच जन्माला आलेल्या मुलांसाठी  तर  अत्यंत महत्वाची असते. नवजात बालक  जर घरात असेल तर स्वच्छतेची विशिष्ठ काळजी घ्यावी लागते. यासाठी लहान मुल  घरात असताना, कश्याप्रकारे स्वच्छतेची काळजी घ्यावी, त्यासाठी कोणत्या सवयी लावून घ्याव्या हे पाहूया.

१. आपले हात स्वच्छ ठेवा

नवजात बाळाची रोगप्रतिकार शक्ती फारच कमी असते त्यामुळे तुमचे हात स्वच्छ नसतील तर बाळाला विविध इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसेच ही  गोष्ट बाळाच्या सतत  आसपास असणाऱ्या प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

२.  पाळीव प्राणी घरात असताना काळजी घ्या.

पाळीव प्राणी घरात असणे चांगली गोष्ट आहे , परंतु लहान मुल घरात असताना त्याला लहान मुला पासून काही दिवस लांब ठेवावे. कारण नवजात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती फार कमी असते. तसेच जर तो प्राणी आजारी असेल तर त्याला बाळाच्या आसपास बिलकुल फिरू देऊ नये. कारण त्यामुळे बाळला इन्फेक्शन होऊन बाळ आजारी पडण्याची शक्यता असते.  

३.मुलाची भांडी स्वच्छ ठेवा

आपण आजारी पडू नये म्हणून स्वच्छ भांड्यामधे जेवण तयार करतो आणि जेवतो तसेच किंवा जरा जास्तीच बाळ खात असलेल्या भांड्याच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी. बाळ दूध पीत असलेले भांडं  दुधाची बाटली इत्यादी निर्जंतुक करून घ्यावी. यामुळे बाळकमी आजारी पडतं.  |

४. जास्त गर्दीच्या ठिकाणी नेऊ नका

नवजात बाळाला  सुरवातीचे काही दिवा गर्दीच्या ठिकाणी जसे  समारंभ , रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड , सार्वजनिक प्रसाधनगृह, यामुळे बाळाला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

५. बाळाच्या खोलीची साफ सफाई

मुल जमिनीवर रंगीत  जमिनीवरील वस्तू तोंडात घालतात, अश्यावेळी बाळाला  खोलीत बाळाला ठेवलं असेल त्या खोलीची फरशी, टेबल  बाळाची खलणी रोज निर्जंतुक करावी.

बाळाला सुरक्षित आणि आजारांपासून दूर ठेवण्यासाठी या प्रकारची स्वछता ठेवणे गरजेचे आहे. आणि बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

%d bloggers like this: