mulache-he-pach-sanket-mulala-aiknya-sandarbhat-samasya-aslyache-darshavtat

 

मुलाला नीट ऐकू येतं  कि नाही किंवा त्या संदर्भात त्याला काही  समस्या आहे का ? याबाबत मुलं त्यांच्या  वागण्यातून काही संकेत देत असतात ते कोणते?  

हे आपण  पाहणार आहोत

१.  आवाजाने न दचकणे

 

साधरणतः लहान मुल  अचानक झालेल्या आवाजाला दचकते. पण जर अचानक झालेल्या आवाजाला दचकले नाही. आणि खूप गोंधळ आणि मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जर मुल  शांत झोपून राहिलं  तर मुलाला ऐकण्याच्या संदर्भात काही समस्या असण्याची शक्यता असते.

२. शांत न होणे

ज्यावेळी मुलाला झोपण्याचा प्रयत्न करता, एखादी अंगाई ऐकवता त्यावेळी जर मुल  काहीच प्रतिक्रिया देत नसेल आणि रडत असेल तर ऐकण्याबाबत समस्या असू शकते. हा संकेत नेहमीच लागू होत नाही कारण काही दुखत-खुपत असेल किंवा तर होत असेल तरी मुल असे वागू शकते. 

३. आवाज करणाऱ्या खेळण्याचा आनंद न घेऊ शकणे.

साधरणतः आवाज करणारी खेळणी  बघून मुलांना उत्साह येतो. ते काहीतरी प्रतिक्रिया देतात किंवा  वेगळ्या आवाजाने रडू लागता. परंतु जर मुल खुळखळा, किंवा  इतर आवाज करणाऱ्या खेळण्याच्या आवाजांना  काहीच प्रतिक्रिया देत नसेल . किंवा इतर आवाज नसलेल्या खेळण्यासारखी प्रतिक्रिया देत असेल किंवा नुसते चेहऱ्याकडे किंवा खेळण्याकार पाहत राहात असेल तर त्याला ऐकण्या संदर्भात समस्या असण्याची शक्यता असते.

४. आवाज काढण्याचा प्रयत्न न करणे

ज्यावेळी मुल सहा महिन्याचे होते  त्यावेळी ते विविध आवाज काढायचं प्रयत्न करते. तुमच्या बोलण्याला आवाजाने प्रतिक्रिया देते.पण जर मुल  असे करत नसेल तर त्याला ऐकण्यासंदर्भत काही समस्या असण्याची शक्यता असते. 

५. ओळखीच्या आवाजानं प्रतिक्रिया ना देणे.  

मुल  साधारणतः २ ते ३ महिन्याचे झाल्यानंतर जर ते नेहमीच्या आवाजानं प्रतिक्रिया देत नसेल तर अश्यावेळी मुलाला  ऐकण्याच्या बाबत काही समस्या असू शकते.

Leave a Reply

%d bloggers like this: