nokarivar-asanrya-aaiche-gharich-asanrya-aaila-prta

 

प्रिय, घरी थांबणारी आई,    Dear @home mother

मला काही लोक तुझ्याबद्धल प्रश्न विचारतात की, तू दिवसभर घरात काय करत असतेस. मला माहितीये कारण काही कालावधीसाठी मीही बाळासाठी घरीच होते. तेव्हा प्रत्येकाला तुझ्याकडून सांगते आणि त्यासाठीच हा पत्र प्रपंच.

तू बिनपगारी काम करतेस, पहाटे उठून कामाला लागतेस रात्री उशिरापर्यंत तुझे काम चालूच असते. झोपसुद्धा तुझी पूर्ण होत नाही. तू सुटी कधीच घेत नाही. रविवार असो की दिवाळी तू नेहमी कामातच गर्क असते. तुझ्यासाठी कामाचे पेमेंट असेल तर तो म्हणजे कुटुंबाचा आनंद.

आपल्या दोघांचे जीवन पूर्णपणे भिन्न आहे. मी ऑफिसात काम करते.आणि  तू घरीच काम करत असते. माझे काम मिटिंग घेणे, मेल करणे, गूगल स्प्रेडशीटवर टाईप करणे, ऑनलाइन काम करणे. पण तुझे काम बाळाचे तासागणिक डायपर बदलणे, बाळाच्या मागोमाग पळून त्याला खाऊ घालणे, बाळ रडणार तर शांत करण्यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्या लढवणे, बाळाला झोपवताना अंगाई गीत नसेल तर पाठीवर थापडत रहाणे आणि त्यातच स्वतःही झोपणे पण लगेच कामे पडली आहेत याची जाणीव होऊन  कधीच न संपणारी कामे तू करत असते.

   मी माझ्या बाळासोबत आहे असे स्वप्नच पाहत असते. पण तू नेहमी बाळासोबत असतेस, त्याच्याशी खेळते, तोही तुझ्यासोबत खेळत असतो, खरंच किती मजा असते माय- लेकांची.

तू कल्पना करत असते की, शांततेत जेवण केल्यावर दुपारी थोडी डुलकी घेऊ. पण तसे कधीच होत नाही.  संध्याकाळी तुमचा नवरा जेव्हा घरी येतो आणि रात्री जेवण झाल्यावर तुम्ही खूप थकून गेल्याने झोपायच्या विचारात असतात आणि नवरा पाय चेपायला लावतो तेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. तू जे काम करतेस त्यात कधी सुटी घेत नाही व कधी पैसेही मागत नाहीस. काही वेळा तुला खूप त्रास होतो कारण सुटी घ्यावी आणि कुठेतरी दूर निघून जावे. आणि शांतपणे आराम करावा.  पण तसे कधी होत नाही ते फक्त आजारी झाल्यावरच होते. तुझे काम कठीणच आहे. आणि समाजसुद्धा खूप हास्यापद रीती- रिवाज स्त्रियांवर लादत असतो.

जर तू घरी राहिलीस तर तुझ्यातले टॅलेंट वायाच जाणार आहे. पण जर बाहेर कामाला राहिली तर बाळाकडे दुर्लक्ष होईल. खरं म्हणजे दोन्ही कल्पना फसव्याचं वाटतात. शेवटी तुही सुधा मूर्ती सारखीच आहेस तीही मुलांसाठी इन्फोसिस ची चेअरमन झाली नाही. अगोदर कुटुंबाला प्राधान्य तुलाच द्यावे लागणार आहे.  

मला तुझी ओळख करून द्यायची आहे कारण तू काही मुलांना सांभाळणारी दाई नाहीस. तुझे काम हे, अशा बाळाला घडवणे आहे की, जो जगाला त्याच्या दृष्टीने बघायला लावतो. आणि तू जे काम करते आहेस. ते काम सर्व कामापेक्षा मोठे व उच्च आहे. मला खूप कौतुक वाटते, तु तुझ्या कामाबद्धल कधीच अपेक्षा करत नाहीस, प्रमोशन मागत नाहीस, प्रसिद्धी कधी पाहिजे नसते, पगारही कधी घेत नाहीस.

आपले जीवन जरी भिन्न असले तरी आपण विचाराने एकच आहोत. आपण दोघी, आपल्या बाळावर खूप प्रेम करतो आणि त्यांच्यासाठी बेस्ट करायला कितीही कष्ट घ्यायला तयार आहोत. आपण त्यांना स्व देऊन टाकतो.

आईपण किती अवघड आहे तरीही आपण ती जबाबदारी आनंदाने पार पाडतो.

फक्त मला हेच सांगायचे आहे की, आपण दोघी आईच आहोत आणि तुझ्या भावना कळताय मला. पण आपल्याला आपले काम चालूच ठेवावे लागेल.  

 

                                                                                                        तुझी बहीण

                                                                                                    नोकरी करणारी आई     

Leave a Reply

%d bloggers like this: