stanpanamule-vajan-kami-hote-ka

 

स्तनपानामुळे वजन कमी होते का? प्रसूतीच्या अगोदर वाढलेल्या ओटीपोटाची चरबीही यामुळे निघून जाते का? मी आता थोडा -थोडा व्यायाम सुरु करायचा का? खरंच स्तनपानामुळे वजन उतरेल का? असे कितीतरी प्रश्न मातेला पडतात. आणि मातेला वजन कमी करणेही महत्वाचे असते. आणि आताच्या संशोधनानुसार सिद्ध झालेय की, स्तनपानामुळे वजन उतरत असते. मग याचा अर्थ असाही काढता येणार

स्तनपानावर बोलण्या अगोदर मातेने स्तनपानासाठी सकस आहार घ्यावा. बऱ्याच मातांना माहिती असते की, स्तनपानासाठी आपल्याला पोषक आहार घ्यावा लागेल पण काही माता खायला कंटाळतात आणि सकस आहार घेत नाही. त्यामुळे अगोदर सकस आहार घ्या. कारण प्रसूतीच्या अगोदर कितीही वजन वाढले चालेल.  जितक्या प्रमाणात तुम्ही पोषक आहे घेणार तितका बाळाच्या वाढीसाठी फायदा होईल. कारण बाळाला प्रत्यक्षपणे आईच्या दुधातून कॅलरीज व प्रोटीन मिळत असतात. बाळाचे पोषण महत्वाचे मग नंतर वजन कमी करण्याची गोष्ट येईल.     

बाळाला जन्म दिल्यानंतर, आईचे काही प्रमाणात वजन कमी होते जितके प्रसूतीच्या अगोदर वजन होते. हे वजन बाळ जेव्हा पोटात वाढत असतो तेव्हाचे असते. आणि जर आईने प्रसुतीपूर्व वजन वाढवले नाहीतर एखाद्यावेळी प्रसूतीच्या वेळी अशक्तपणा येऊ शकतो. वाटल्यास प्रसूतीनंतर वजन घटवण्यास त्रास होईल पण बाळ व मातेचे आरोग्य चांगले राहील.

बाळाच्या जन्म झाल्यावर काही दिवसांनी तुम्हाला वजन घटवण्याची इच्छा होईल. आणि आताच्या वेळी ती योग्यही आहे. तेव्हा स्तनपानामुळे तुमच्या ३०० – ४०० कॅलरीज एका वेळी कमी होतील. काही माता म्हणतील की, स्तनपानासाठी जर मी जास्त आहार घेत असेल तर त्यामुळे थोड्याफार प्रमाणात कॅलरीज कमी होतील. पण तसे नाहीये. त्या पोषक आहार शरीरासाठी आवश्यक असतो. आणि त्याच्याने वजन वाढत नसते. आणि जर तुम्ही खाल्लेच नाहीतर दररोज साठी शक्ती कुठून येणार. तेव्हा असा विचार करू नका.

तुम्हाला प्रसूतीनंतर लगेच व्यायाम करता येत नाही किंवा जड वजनही उचलता येत नाही. कारण प्रसुतीचे टाके हे ओले असतात आणि त्यात वजन उचलून समस्या निर्माण होऊ शकते. तेव्हा असे काही करता येत नाही आणि वजन वाढते राहते. अशी चिंता तुम्हाला वाटते. त्याच वेळी स्तनपान ही गोष्ट काही प्रमाणात वजन उतरवण्यासाठी कामास येते. म्हणून जर शक्य झाल्यास बाळाला भूक लागेल तेव्हा त्याला दूध पाजत रहा. साधारणतः ७-८ महिन्यानंतर बाहेरचे दूध द्या. पण तेही दुसरा पर्याय नसेल तर. नाहीतर स्तनपान करत रहा. खूप मातांचा अनुभव आहे की, स्तनपानमध्ये त्यांचे वजन उतरण्यास खूप मदत झाली होती. पण याचा अर्थ असा घेता येणार नाही की, स्तनपान वजन उरवण्यासाठी करण्याचे साधन आहे. तसे बिलकुल नाही. स्तनपान बाळाच्या भुकेसाठीच द्यावे. फक्त त्याचे अप्रत्यक्ष फायदे मिळतात. असाच विचार करावा.

Leave a Reply

%d bloggers like this: