ya-goshti-tumchya-sasubaina-tumhala-sangaychya-astat

तुम्हाला तुमच्या सासूबाईंबद्दल बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतील. पण तुम्ही त्यांना सांगू शकला नसाल. पण असं  देखील असू शकतं की तुमच्या सासूबाईंना देखील काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील. पण त्यांना सांगता आल्या नसतील. आम्ही काही अश्या गोष्टी तुम्हांला सांगणार आहोत ज्या कदाचित तुमच्या सासूबाईंना देखील सांगायच्या असतील. सांगता आल्या नसतील. त्या गोष्टी कोणत्या त्या आपण पुढे बघुया  

१. आपण एक कुटूंब आहोत

तुमचं नवीनच लग्न झाले असेल तर तुम्हांला माहेरची खूप आठवण येत असेल. आणि हे साहजिक आहे पण आम्ही पण तुझी तेव्हढीच काळजी घेऊ. तुला मुलीसारखं मानू तू देखील आमच्याशी आई-वडलांसारखं मोकळेपणाने बोलू शकतेस. तू आता आमच्या कुटुंबाचा एक भाग झाली आहेस आणि आपण एक कुटूंब आहोत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची काळजी करू नको.

२. आम्हांला आमच्या नातवंडापासून लांब ठेऊ नको

प्रत्येक आजी-आजोबा या गोष्टीला घाबरत असतात की त्यांना त्यांच्या नातवंडापासून कोणी दूर तर करणार नाही ना? आपल्यात कितीही मतभेद असले तरी त्याचा परिणाम आमच्या आणि आमच्या नातवंडांच्या नात्यावर होऊ देऊ नको. त्याच्या एका हास्याने आमचा पूर्ण  दिवस चांगला जातो. नातवंडापासून दूर केल्यावर आम्हांला खूप त्रास होईल. 

३. माझ्या मुलाची नीट काळजी घे.

जसं नवीन कुटुंबात आल्यावर तुम्ही जश्या काळजीत असतात तश्याच तुमच्या सासूबाई देखील काळजीत असतात . आपल्या मुलाला योग्य जोडीदार मिळाला आहे की, ती त्याची काळजी नीट घेईल की याबाबत चिंतेत असतात. त्यामुळे माझ्या मुलाची योग्य काळजी घे म्हणजे माझी चिंता मिटेल हे त्याना तुम्हांला सांगायचे असते.

४. आभार मानणे

कधी-कधी तुमच्या सासूबाईंना तुम्ही  कुटूंबाला आपलंसं केल्याबद्दल आभार मानायचे असतात. तुम्ही घेतलेली कुटुंबाची काळजी कुटूंबासाठी केलेले त्याग, तडजोडी याबाबत त्यांना जाणीव असते म्हणून त्यांना तुमचे आभार मानायचे असतात. कश्याप्रकारे आभार मानू  या प्रश्नामुळे त्या हि गोष्टं तुम्हांला सांगू शकत नाही

५. माझ्याशी  बोलवं 

कधी-कधी तुम्हांला एखादी गोष्ट एखादा चिंता सतावत असेल.एखाद्या बाबतीत निर्णय घेणे कठीण जात असते, काही बाबतीत द्विधा मनस्थिती असता. एकाद्या आठवणीने मन बेचैन झालेले असते.आणि या गोष्टी तुमच्या चेहऱ्यावरून त्यांना कळून येतात अश्यावेळी तुम्ही त्याच्याशी बोलावं. त्यातून त्यांना काही मार्ग सुचतो का ते त्यांना विचारावं असं  त्यांना वाटत असतं 

६. तुझा पती माझा मुलगा देखील आहे.

तुमच्या सासूबाईंने हे स्वीकारलं असेल आपल्या मुलाच्या आयुष्यात आता एक आणखी महत्वपूर्ण व्यक्ती अली आहे आहे. आणि त्याने तुम्हांला  वेळ देणे गरजेचे आहे परंतु त्याचबरोबर आम्हांला देखील त्याच्या आधाराची त्याचा वेळाची गरज आहे जसा तुमचा तो पती आहे तसा माझा मुलगा देखील आहे. तर त्याचा थोडासा वेळ आम्हांला  मिळावा ही  त्यांची अपेक्षा असते पण त्यानं हे सांगणं जमत नाही कारण यामुळे नात्यात गैरसमज होण्याची शक्यता असते.

Leave a Reply

%d bloggers like this: