abhinetri-lisa-hedan-tichya-balavishayi-anubhav-sangitale-aani-stanpanabaddhal

 

लिसा हेडन बाँलिवूड अभिनेत्री आहे. तिने महिन्यापूर्वी एका बाळाला जन्म दिला. त्याचे नाव जॅक ललवाणी आहे. लिसा हेडन सारख्या अभिनेत्रीने आपले स्वतःचे अनुभव इंस्टाग्राम या पेजवर शेअर केले आहेत. त्याचाच काही अंश.

आजच लिसाने बाळाला स्तनपान करतानाचा फोटो सोशल माध्यमावर टाकला आहे, आणि त्यातून खूप मोठा संदेशही तिने दिलाय. ती सांगते, “मी आई झाल्यावर खूप लोकांनी मला संदेश पाठवून विचारले की, तुला एका बाळाला जन्म दिल्यावर काय वाटतेय. आणि तुझ्या वजनाला व फिटनेसला कसे सांभाळशील. खरं म्हणजे खूप अर्थपूर्ण जीवन वाटतेय आता. आणि सध्या स्तनपानाचा आठवडा चालूय. आणि मी स्तनपानाला खूप मार्क देईल. कारण स्तनपानामुळेच मी बाळाच्या जन्मानंतर पुन्हा माझ्या अगोदरच्या साईजमध्ये येऊ शकली, वाढलेले वजनही कमी व्हायला लागलेय. आणि हे सर्व नियमित स्तनपानमुळेच शक्य झाले. स्तनपान हे माझ्यासाठी आव्हानात्मक होतेच. पण मी ते करायला शिकले व आता सरावाने जमायला लागले. स्तनपानामुळे वेळ कमी खर्च होतो. कारण जितके बाहेरचे दूध देण्यासाठी कष्ट घेणार त्याच्यापेक्षा कमी वेळात तुम्ही बाळाला दूध पाजून मोकळ्या होणार. दूध पाजल्यामुळे माझे व बाळाचे ऋणानुबंध तयार झाले, सोबत माझ्या दुधातून त्याचे संपूर्ण पोषण होऊन लवकर तो मोठा होईल. खरंच माझ्या तान्ह्या बाळासाठी स्तनपान किती महत्वाचे आहे ते मी स्वतः अनुभवत आहे. Happy #worldbreastfeedingweek”  

  तिचे म्हणणे प्रत्येक आईसाठी प्रेरणादायी आहे.

रात्री बाळ तिच्याबाजूला झोपला होता, आणि तो खूपच सुंदर दिसत आहे. आणि तिने फोटो काढून इंस्ट्राग्राम वर शेअर केले आहेत. आणि तिने टॅगलाईन दिली “weekend Vibe’’

लिसा ही तिच्या खूप दिवसांपासून मित्र असलेल्या दिन ललवाणी याच्यासोबत लग्न करून एकत्र राहत आहे. तीने तिच्या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, माझ्या मते जीवन हे लग्नानंतरसुद्धा खूप काही बदलत नसते. मी पुन्हा तशीच कामाला जात होते. पण जेव्हा बाळाला जन्म दिला तेव्हा सर्व काही बदलले आहे. आणि तुम्ही जर अशा माणसासोबत लग्न केलय की तो तुम्हाला, तुमच्या जीवनशैली आणि प्रोफेशनला समजून घेत असेल तर तुम्ही नक्कीच योग्य व्यक्तीसोबत लग्न केलेय. लग्न झाल्यावर तुमच्या जोडीदारासोबत वचन घेऊन घ्या. नवऱ्याची तुमच्यासोबत बांधिलकी असायला हवी. सर्व नवीन होणाऱ्या मातांना माझ्याकडून शुभेच्छा !      

Leave a Reply

%d bloggers like this: