garodarpanatil-murmavar-upay

बऱ्याच महिलांना गरोदर असताना चेहऱयावर खूप मुरमे येतात.साधारणतः दुसऱ्या तिमाही मुरमे येतात  मध्ये संप्रेरकतील( हार्मोन्स) बदलामुळे हे असे होत असते. त्यामुळे तुमचा चेहरा तेलकट आणि कसातरी दिसतो. या तेलकटपणासाठी आणि मुरमांसाठी काही घरगुती उपाय पुढील प्रमाणे

१. अँप्पल सीडर व्हिनेगर

         हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतं. या मध्ये एक कापूस बुडून तेलकट आणि मुरूम असलेल्या भागावर लावा. याचा तुम्ही नैसर्गिक टोनर म्हणून देखील वापर करू शकता. थोड्याश्या सीडर व्हिनेगर मध्ये पाणी मिसळून टोनर तयार करा. सहसा याने काही दुष्परिणाम होत नाही तरी एकदा आधी ऍलर्जी टेस्ट घ्या.

२. चंदन आणि गुलाबपाणी

चंदन आणि गुलाब पाणी एकत्र करून त्याची पेस्ट या मुरमांवर लावा. असे तेज केल्यावर चेहऱ्यला थंडावा मिळतोच आणि  मुरमे कमी होतात आणि तप्रसन्न देखील वाटते.

३. खोबरेल तेल

आपण तेलकट त्वचेपासून सुटका करून घ्यायचा विचारत असतं. खोबरेल तेल कसे उपाय म्हणून कसा काय सांगत आहे. असा विचार तुमच्या मनात आला असेल. नारळाचे तेल हे एक असे तेल आहे जे तुमच्या मुरमासाठी  आणि कोरड्या त्वचेमुळे बिघडलेला चेहऱ्याचा तजेला पुन्हा मिळवून देते.  तसेच याचा मॉश्चरायजर म्हणून देखील वापर करता येऊ शकतो. आणि मेकअप करायचा आधी थोडेसे तेल चेहऱ्याला लावल्यास मेकअप उतरवताना उपयोग होतो. व सौंदर्यप्रसाधनातील केमिकलचा चेहऱ्यावर होणार दुष्परिणाम कमी करतो.  

४ डाळीचे पीठ आणि हळद

डाळीचे पीठ हळद एकत्र करून त्यात थोडे गुलाब पाणी घालावे आणि तो लेप चेहऱ्यावर लावावा आणि थोड्यावेळाने धुवा.

५.मध

मध हे मॉश्चराइजर चे काम करते तसेच यामुळे मुरमामुळे काळवंडलेला चेहरा उजळ होण्यास मदत होते. नुसते मध चेहऱ्याला लावावे आणि ते १५-३० मिनटे तसेच ठेवावे. नंतर व्यवस्थित कोमट पाण्याने धुवून घ्या. से चेहरा मुरुमांमुळे पडलेले डाग कमी करण्यास मदत

Leave a Reply

%d bloggers like this: