masikpalichya-darmyan-swachtebabat-ya-goshti-lakshat-theva

मासिक पाळीचे दिवस म्हणजे महिलांसाठी कठीण दिवस असतात. हे दिवस कितीही  त्रासदायक असले तरी  याकाळात  शाररिक आणि इतर स्वच्छतेची काळजी घेणे गरजेचे असते.या स्वछ्तेबाबत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. पॅड बदलणया वेळी वापरण्यात येणारे पॅड हे ३-४ तासाने बदलणे गरजेचे असते. हे तुमच्या योनीच्या स्वछतेसाठी आणि आरोग्यासाठी आवश्यक असते . या काळात  योनी आणि मूत्राशयाच्या भागात ओलसरपणामुळे आणि इतर कारणामुळे  इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पॅड वारंवार बदलणे गरजेचे असत

२. शाररिक स्वछता

यावेळी आपले गुप्तांग कोमट पाणी आणि सौम्य साबणाने स्वच्छ  करावे. किंवा नुसत्या कोमट पाण्याने स्वच्छ करावे . दिवसातून २ वेळा तरी असे करावे. यावेळी वापरण्यात येणारा  साबण हा खूप सौम्य असावा. शक्य असल्यास दिवसातून दोनदा अंघोळ करावी

३.  क्रीम्स किंवा साबणचा वापर

या काळात आणि इतरवेळी देखील गुप्तांगाची स्वछता करताना केमिकलयुक्त साबण आणि क्रिम्सचा वापर कमी करावा. सौम्य साबण आणि क्रिम्सचा वापर करावा. 

४. सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट

वापरून खराब झालेले सॅनिटरी नॅपकिन हे कागदात व्यवस्थित गुंढाळून कचऱ्याच्या डब्यात टाकवे. कमोड मध्ये किंवा बाथरूम मध्ये कुठे टाकू नये. असे केल्यास दुर्गंधी येते तसे त्यामुळे बाथरूम मध्ये बैक्टेरियाची वाढ होण्याची शक्यता असते. याबाबतची स्वच्छता पूर्ण कुटुंबच्या आरोग्यसाठी गरजेची असते

५. कपड्याच्या नॅपकिनची स्वच्छता

जर पुन्हा वापरता येणारे नॅपकिन वापरात असाल तर याबाबत जास्त स्वछता करणे गरजेचे असते एकदा हे वापरून झाल्यावर .ते स्वच्छ धुवून मग निर्जंतुक करून. नीट वाळल्यानंतरच पुन्हा त्याचा वापर करावा.

Leave a Reply

%d bloggers like this: