sadhyachya-kalat-mulacha-vichar kartana-ya-goshticha-vichar-kara

 

आपल्या सगळ्यांना लहान मुलं आवडतात. आपल्याला देखील एक मुल  असावं अशी प्रत्येकची इच्छा असते. तुमच्या विश्वासावर एक जीव या जगात येणार असतो आणि त्याची पूर्ण जबाबदारी तुमची असते त्यामुळे सध्याच्या काळात  हा निर्णय घेताना पुढील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते.

१. तुमचे तुमच्या जोडीदारासोबतचे नाते

तुम्ही घरात अजून एक सदस्यची जबाबदारी पेलायला समर्थ आहात  का ? जर उत्तर हो असेल तर चांगली गोष्ट आहे . पण जर उत्तर नाही असेल तर, तुम्हला या गोष्टीचा खोलवर विचार करणे गरजेचे आहे. तुमच्या घरातील परिस्थिती,तुमचे आणि तुमच्या जोडीदारा बरोबरचे नाते कसे आहे ? जर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे सतत खटके उडत असतील तर. बाळाचा विचार करताना पुन्हा एकदा विचार करा. तुमच्यातील समज गैरसमज दूर करा. तुमच्या नात्यातील समज-गैरसमजाचे वाईट परिणाम तुमच्या लहान मुलावर होऊ शकतात.त्यामुळे या गोष्टीचा देखील विचार करा. तसेच दोघांनाही मुल  हवे असल्यास याबाबतीत पुढे जा.

२.  करियर आणि बाळा

तुम्हाला तुमचं  करियर आणि  तुमच बाळ  या दोन्ही गोष्टींना सारखाच वेळ आणि महत्व  देणे या काळात थोडे अवघड असते. विशेषतः महिलांसाठी हे पुरुषापेक्षा जास्त अवघड असते. त्यामुळे कदाचित तुमच्या आणि बाळाला वाढताना बघणे आणि तुमचे करियर याची सांगड कशी घालता येईल ही  गोष्ट लक्षात घ्यावी. पस्तावण्यात आणि बाळाला दोष देण्यात अर्थ नाही.

. आहार आणि सवयी

सध्याची आपली जीवन पद्धती ही फार धक-धकीची आणि जंक फूडची आहे . त्यामुळे बाळाचा विचार करताना आपला आहार आणि आपल्या सवयी यांच  विचार करावा. बाळाचा विचार करताना आपल्या आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे व काही वाईट सवयीमुळे जन्मला येणाऱ्या बाळाला भविष्यात काही समस्यांना सामोरे तर जावे लागणार नाही ? याची काळजी घ्यावी. तसेच बाळाचा विचार करताना पती आणि पत्नी दोघांचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते.  बाळाचा विचार पक्का झाल्यावर दोघांनी  सकस आहार घेणे आणिहानिकारक सवयी सोडून देणे आवश्यक आहे. सुदृढ बाळासाठी या आहार आणि इतर सवयी यांचा  विचार करणे आवश्यक असते.

४. आर्थिक स्थैर्य

तुम्ही आर्थिकदृष्ट्या बाळाची जबाबदारी पेलण्यास सक्षम आहात का? बाळाच्या सर्व गरजा पूर्ण करण्या इतकी आर्थिक परिस्थिती तुमच्यकडे आहे का? तुम्ही बाळासाठी किंवा कुटुंबासाठी काही तरतूद किंवा त्याबाबत विचार केला आहे का? त्यासाठी तुम्हांला  कर्जचा आधार घ्यावा लागणार नाही ना?आणि त्यामुळे तुमच्यावर तणाव वाढून त्याचा परिणाम बळावर आणि कुटुंबावर तर होणार नाही ना?

वरील सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करा आणि मगच बाळाचा विचार करा अन्यथा उगाच एक जीवाला जगात आणून अडचणीत टाकू नका.

Leave a Reply

%d bloggers like this: