ya-pach-goshticha-prtyek-honarya-pityala-bhiti-vatat-aste

 

    आई-वडील होणे हा एक सुंदर अनुभव असतो. ज्यावेळी स्त्री गरोदर होते त्यावेळी फक्त तिचीच जबाबदारी वाढते असं  नाही. त्याचवेळी तिच्या नवऱ्याची देखील तेवढीच जबाबदारी वाढलेली असते. त्याला देखील एका जबाबदारीची जाणीव झालेली असते. आणि तो बाळ घरी येणार म्हणून चांगलाच तयारीला लागलेले असतो. पण कुठेतरी काही गोष्टींची त्याला भीती वाटत असते. पण तो आपल्या बाईक समोर ती घाबरू नये म्हणून आपली भीती चेहऱयावर दिसू देत नाही. अश्या गोष्टी कोणत्या ते आपण पुढेबघणार आहोत

१. मी चांगला पिता होऊ शकेल कि नाही?

प्रत्येक होणाऱ्या बाळाच्या पित्याला एक भीती नेहमीच त्रास देत असते . मी एक चांगला पिता होईल कि नाही याची काळजी वाटत असते.आणि हे असं वाटणे साहजिक असते. ते स्वतःबद्दल एक पिता म्हणून मत बनवायला लागतात. काळजी करण्याची गरज नाही तुमि तुमच्या होणाऱ्या बाळाबाबत एवढाविचार करत आहात म्हणजे तुम्ही नक्की चांगले पिता होणार आहात.

२. मी माझ्या बाळाची आणि पत्नीची काळजी घेऊ शकेन ना ?

आपल्या बाळाची आणि पत्नीची काळजी घेणं हे होणाऱ्या पित्याची  एक मोठी जबाबदारी असते. प्रत्येक संकटातून वाचवणे, आजारपणात काळजी घेणे. पत्नी गरोदर असताना तिची आणि पोटातल्या बाळाची काळजी घेणे हे सर्व आपल्याला जमेल ना? याबाबत होणारा  पिता नेहमी काळजीत असतो.  

३.तिला /त्याला मी आवडेना ना ?

अजून एक गोष्ट होणाऱ्या पित्याला सतावत असते. ती म्हणजे माझ्या होणारी बाळाला मी आवडेन ना?  ९ महिने आईच्या पोटात राहून आईच्या प्रेमाची जाणीव त्याला /तिला झाली असते पण मी तिला आवडेना ना ?  का तिला फक्त आईच प्रिय असेल?अशी भीती असणारे बाबा आपल्या बळावर खूप प्रेम करणारे बाबा होतात. आणि आपल्या बाळाची जीवापाड काळजी घेतात.

४. प्रसूती वेदना सुरु झाल्यावर मी काय करावे  ?”

जर पत्नीला प्रसूती वेदना सुरु झाल्यावर मी काय करू? आणि माझ्याकडून त्यावेळी काही चूक तर होणार नाही ना? त्यामुळे माझ्या बायकोला काही होणार तर नाही ना? मी तिला वेळेत दवाखान्यात घेऊन जाऊ शकेल ना ?  या बाबत डॉक्टारांशी बोलून प्रसूती वेदना सुरु झाल्यावर काय करावं हे समजावून घ्या. आणि काळजी करू नका.

५. जर माझ्याकडून बाळ पडलं तर  ?”

बाळाच्याबाबत अति काळजी केल्याने असे विचार होणाऱ्या पित्याच्या मनात येऊ शकतात. ज्यावेळी ते छोटयाश्या बाळाला हातात घेतात त्यावेळी माझ्याकडून बाळ पडणार तर नाही ना ? ही काळजी सतावत असते.आणि हि गोष्ट ते आपल्या पत्नीला सांगू शकत नसतात. कारण स्वतःनंतर बाळाबाबत तिचा त्याच्यावरच जास्त विश्वास असतो. त्यामुळे पत्नी अजून घाबरण्याची शक्यता असते. काळजी करू नका सुरवातीला थोडी भेटी वाटेन नंतर सवयीनं सर्व गोष्टी सोप्प्या होतील.

पिता हा कितीही कठोर आणि असला तरी बाळाच्या बाबतीत हळवा असतो. कधी-कधी बाळाच्या बाबतीत  ते आईपेक्षा जास्त बाबतीत हळवा होतो. आणि आपल्या बाळाच्या व कुटुंबाच्या सुखासाठी झटत असतो.

Leave a Reply

%d bloggers like this: